फक्त 20 लाखांमध्ये घरी आणा “या” SUV; बघा यादी

Ahmednagarlive24 office
Published:

Best SUV Cars in India : भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार एसयूव्ही आहेत. जर तुम्ही सध्या स्वतःसाठी एक नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 20 लाख रुपये आहे, तर आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट SUV ची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग कोणत्या या
SUV ते पाहुयात.

Kia Seltos facelift

2023 Kia Seltos facelift साठी तुम्हाला 10.90 लाख रुपये मोजावे लागतील. या कारला 1.5L NA पेट्रोल, 1.5L डिझेल आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो. यात नवीन फ्रंट ग्रिल, पुन्हा डिझाइन केलेले LED DRLs आणि टेललाइट डिझाइन आहे.

Hyundai Creta

Hyundai Creta ला आता 1.5-लीटर NA पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्याय आहेत. या SUV ची किंमत 10.87 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.20 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

Hyundai Alcazar

याततुम्हाला 1.5L टर्बो पेट्रोल (160PS) आणि 1.5L डिझेल (115PS) इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. याची किंमती 16.77 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Alcazarमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, रीअर डिस्क ब्रेक, सीट बेल्ट आणि ISOFIX देखील मिळतात.

MG Astor

या कारची किंमत 10.82 लाख रुपये ते 18.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि ती 1.5-लीटर एनए पेट्रोल आणि 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते.

MG Hector, Hector Plus

एमजी हेक्टरची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होते, तर तीन-रो प्रकाराची किंमत 18 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. SUV मध्ये समान 1.5-लीटर टर्बो पेट्रोल (143 PS), आणि 2.0-लीटर डिझेल (170 PS) इंजिन पर्याय आहेत. यात लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, इन्फिनिटी साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि पॉवर ड्रायव्हर सीट आहेत. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या SUV मध्ये 6-एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, 360-डिग्री कॅमेरा आणि इतर फीचर्स आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe