चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी BYD ने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक SUV, BYD Sealion7 सादर केली असून, ती लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे.या SUV च्या आकर्षक डिझाइन,दमदार बॅटरी आणि उच्च ड्रायव्हिंग रेंजमुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
कंपनीने ही कार 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे, ग्राहक या कारची बुकिंग 18 जानेवारी पासून सुरू करू शकतात आणि फक्त 70000 रुपये भरून ती बुकिंग करता येईल. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून काही विशेष फायदेही मिळणार आहेत, ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक ठरणार आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-85.jpg)
BYD Sealion7 ची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 45 लाख रुपयांपासून सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे.ही प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Hyundai Ioniq5, Kia EV6 आणि BMW iX7 सारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करेल.या SUV मध्ये 82.56 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे,
जी उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते.ही गाडी केवळ 4.5 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते,तर पूर्ण चार्ज केल्यावर 567 किमीची रेंज प्रदान करते. SUV मध्ये 390 kW ची मोटर बसवण्यात आली आहे, जी 690 Nm टॉर्क निर्माण करण्याची क्षमता ठेवते. कंपनी या SUV सोबत 7 kW क्षमतेचा चार्जर देणार असून, जो जलद आणि सुरक्षित चार्जिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या SUV मध्ये प्रीमियम वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवास अधिक लक्झरी आणि आरामदायी होतो. यात पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले आणि 15.6-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे, जी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
याशिवाय, नप्पा लेदर सीट्स, 128 रंगांचे अँबियंट लाइट्स, वायरलेस फोन चार्जर, वॉटर ड्रॉप डिझाइन टेल लॅम्प आणि 12 स्पीकर असलेली साउंड सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे एक प्रीमियम अनुभव मिळतो. गाडीत प्रशस्त आणि आरामदायी जागा उपलब्ध असून, त्यामुळे ही SUV लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कार अतिशय विश्वासार्ह असून, यात 11 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत, जे प्रवाशांसाठी अधिक सुरक्षिततेचे आश्वासन देतात. लक्झरी, परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेचा परिपूर्ण मिलाफ असलेल्या BYD Sealion7 मुळे भारतीय बाजारपेठेत प्रीमियम इलेक्ट्रिक SUV च्या स्पर्धेत मोठी वाढ होईल आणि ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होईल.