Car Loan Tips : कार लोन घेताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर व्हाल कंगाल

Ahmednagarlive24 office
Published:
Car Loan Tips

Car Loan Tips : सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर कार खरेदी केली जाते. आता जर तुमच्याकडे आवश्यक ते पैसे नसतील तर काळजी करू नका. समजा तुम्ही काही कारणास्तव नवीन कारसाठी पूर्ण बजेट व्यवस्था करू शकत नसल्यास तुम्ही कर्ज घेऊन कार खरेदी करू शकता.

महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांनी कार लोनची प्रक्रियाही खूप सोपी केली आहे. ज्यामुळे तुम्हाला आता एका दिवसातही कार लोन मिळेल. परंतु लोन घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

कारण अलीकडच्या काळात कर्ज घेण्यापेक्षा त्याची परतफेड करणे खूप अवघड झाले आहे, ज्यामुळे नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काहीच नसते. समजा आता तुम्हीही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर घाई न करता विचार करून लोन घ्या.

कर्जाचा कालावधी

कार खरेदी करत असताना तुम्ही कर्जाचा कालावधी कमी ठेवावा. असेल केल्याने तुमचे दोन फायदे होऊ शकतात, त्यामुळे तुमचे कर्ज लवकरात लवकर फेडले जाईल. दुसरे म्हणजे, तुम्हाला जास्त व्याज देण्याची गरज पडणार नाही.

बजेट करा निश्चित

समजा तुम्ही कर्जाद्वारे कार घेण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी बजेट निश्चित करा. कारण जर तुम्ही अगोदर बजेट तयार केले नाही तर जास्त खर्च होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कार लोन घेत असताना तुम्ही बजेट निश्चित करावे.

डाउन पेमेंट

कार लोन दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या हप्त्यांशिवाय सर्वात अगोदर डाउन पेमेंट देखील भरावे लागते. डाउन पेमेंटची रक्कम शक्य तितकी जास्त करण्याचा प्रयत्न करावा हे लक्षात ठेवा. समजा तुम्ही जास्त डाउन पेमेंट केले तर तुम्हाला हप्त्यांमध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे नंतर ईएमआय भरण्यात कोणतीही अडचण येत नाही.

क्रेडिट स्कोअर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा लाभ घेत असताना तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होईल. परंतु कर्ज भरत असताना तुम्ही काही निष्काळजीपणा केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्याची शक्यता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe