Car Market Update : Volkswagen India ने भारतीय बाजारासाठी 2026 साठी आक्रमक आणि दीर्घकालीन रणनीती आखली आहे. कंपनी येत्या वर्षभरात एकूण पाच नवीन गाड्या लाँच करण्याची तयारी करत असून, विशेष म्हणजे हे लाँच वर्षभर वेगवेगळ्या तिमाहींमध्ये टप्प्याटप्प्याने केले जाणार आहेत.
त्यामुळे दर काही महिन्यांनी Volkswagen ची एक नवीन कार भारतीय ग्राहकांसमोर येणार आहे. या नवीन लाइनअपमध्ये SUV, सेडान आणि हॅचबॅक अशा तिन्ही सेगमेंटमधील गाड्यांचा समावेश असेल. यामुळे Volkswagen प्रीमियम आणि टेक्नॉलॉजी-प्रेमी ग्राहकांना अधिक प्रभावीपणे लक्ष्य करणार आहे.

या आगामी गाड्यांपैकी Volkswagen Tayron R-Line ही सर्वाधिक चर्चेत असलेली SUV ठरली आहे. कंपनीने या प्रीमियम 7-सीटर SUV चे अधिकृत फोटोही जाहीर केले असून, Tayron R-Line ही सर्वात आधी लाँच होण्याची शक्यता आहे.
स्टाइल, मोठी स्पेस आणि दमदार परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण मेळ शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही SUV खास असेल. समोर आलेल्या चित्रांवरून Tayron R-Line चे डिझाइन अधिक स्पोर्टी, मस्क्युलर आणि आक्रमक दिसते, जे इतर Volkswagen SUVs पेक्षा वेगळे ठरते.
डिझाइनच्या बाबतीत Tayron R-Line ला स्पोर्टी डिझाइन लँग्वेज देण्यात आली आहे. शार्प बॉडी लाईन्स, बोल्ड फ्रंट प्रोफाइल आणि प्रीमियम फिनिश यामुळे ही SUV अतिशय आकर्षक दिसते. कुटुंबासोबत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि प्रीमियम अनुभवासाठी ही एक उत्तम निवड ठरू शकते.
फीचर्सच्या बाबतीत Tayron R-Line अत्याधुनिक असेल. यात 15-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, Harman Kardon साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, ड्युअल वायरलेस चार्जर, थ्री-झोन ऑटोमॅटिक AC, 30-कलर एम्बियंट लाइटिंग आणि मसाज फंक्शनसह फ्रंट सीट्स मिळतील.
सेफ्टीच्या बाबतीतही Tayron R-Line दमदार आहे. यात 9 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पार्किंग सेन्सर्स, चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ADAS फीचर्स देण्यात येतील. SUV ची लांबी 4792 मिमी असून व्हीलबेस 2789 मिमी आहे.
तीन रो सीट्ससह 345 लीटर बूट स्पेस मिळेल, तर तिसरी रो फोल्ड केल्यास ही स्पेस 850 लीटरपर्यंत वाढेल. एकूणच, Tayron R-Line मुळे Volkswagen India चा प्रीमियम SUV सेगमेंटमधील दबदबा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.













