Car Tips: चुकूनही ‘या’ चुका करू नका नाहीतर बॉम्बप्रमाणे स्फोट होईल तुमची कार

Ahmednagarlive24 office
Published:

Car Tips:  तुम्ही देखील कार वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही कार वापरत असताना काही गोष्टींची काळजी घेतली नाहीतर तुमच्या कारचा स्फोट होऊ शकतो. चला मग जाणून घेऊया कार वापरत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

इंजिन टेंपरेचर

कारचे इंजिन जास्त तापले तर आग लागण्याचा धोका असतो, इंजिन टेंपरेचरबाबत काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कार इंजिन थंड ठेवण्यासाठी उपाय करतात, जसे की इंजिनजवळ पंखा असणे, ज्यामुळे इंजिनवर हवा वाहते, याशिवाय, इंजिन थंड ठेवण्यासाठी कूलंटचा वापर केला जातो. आज सर्व कार्सना इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर लाइट दिला जातो ज्यामुळे जेव्हा इंजिनचे टेंपरेचर वाढते तेव्हा ती ऑन होते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, अन्यथा कारला आग लागू शकते.

सीएनजी लीकेज

जर तुम्ही सीएनजी कार वापरत असाल तर लीकेजची विशेष काळजी घ्या, सीएनजी कारमध्ये लीकेज होण्याचा धोका असतो, त्यामुळे सीएनजी कार वापरणाऱ्यांना कधी सीएनजी लिकेज होत असल्याचे जाणवले, तर त्यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. लीकेजही वेळोवेळी तपासणी व्हायला हवी. याशिवाय कारमध्ये बसल्यावर सीएनजीचा वास तर येत नाही ना याकडे लक्ष द्या. सीएनजी लिकेज होत असेल तर गाडीपासून दूर जा, सीएनजी लिकेज झाल्यास गाडी चालवण्याची चूक कधीही करू नका.

धूम्रपान

कारमध्ये धुम्रपान करणे देखील टाळावे. जर एखादी व्यक्ती कारमध्ये धुम्रपान करत असेल आणि सीएनजी लिकेज असेल तर ती लगेच आग पकडते. ही आग भीषण असू शकते, कारचा स्फोटही होऊ शकतो.

हे पण वाचा :-  Business Idea: या उन्हाळ्यात सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय ! दरमहा होणार हजारोंची कमाई

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe