Car Viral News : तुम्हीही येत्या काळात नवीन गाडी घेणार असाल किंवा तुमच्याकडे आधीच गाडी असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण गाडीच्या इंजिन बाबत माहिती पाहणार आहोत.
कारचालकांना हिवाळ्यात आपल्या गाडीच्या इंजिनची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण की हिवाळ्याचा गाडीचा इंजिन वर सुद्धा परिणाम होतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही चुका केल्या तर गाडीचे इंजिन खराब होण्याचा धोका असतो.

दरम्यान आज आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीच इंजिन खराब होऊ नये यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी माहिती पाहणार आहोत. तज्ञ सांगतात की हिवाळ्यातील कमी तापमानाचा इंजिन ऑइल वर थेट परिणाम होत असतो. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये गाडीच्या इंजिनची अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे.
वाहन चालकांनी काय काळजी घ्यावी
आपल्यापैकी कित्येक लोक हे किलोमीटरच्या आधारावर गाडीचे इंजिन ऑइल बदलत असतात. हिवाळा असो उन्हाळा असो की पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये आपण फक्त गाडीचे किलोमीटर पाहतो आणि त्यानुसार मग इंजिन ऑइल बदलायचे की नाही हे ठरवतो.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इंजिन ऑइल लवकर बदलणे गरजेचे आहे. तसेच योग्य ऑइल वापरणे सुद्धा आवश्यक आहे. योग्य वेळी ऑइल बदलले गेले नाही तर त्याचा मशीनवर ताण येतो. कंपन्या साधारणता पाच ते दहा हजार किलोमीटर रन झाला की मग इंजिन ऑइल बदलण्याची शिफारस करतात.
साधारणता सहा महिन्यांपासून ते एक वर्ष कालावधीच्या आत इंजिन ऑइल चेंज करणे आवश्यक आहे. पण थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी सहा महिन्याची वाट पाहू नये, त्याआधीच गाडीचे इंजिन ऑइल बदलून घ्यावे.
तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सिंथेटिक ऑइल वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे असे ऑइल असते जे हिवाळ्यात सुद्धा इंजिनचे कंबशन योग्य पद्धतीने सुरू ठेवते. पण योग्य विस्कॉसिटी ग्रेडचे ऑइल निवडणे आवश्यक आहे.
मॅन्युअलमध्ये सांगितलंय तेच ऑइल वापरावे. बॉटलवर जो W लिहिलेला असतो त्या आधीचा अंक जेवढा कमी तेवढे हिवाळ्यात ऑइल पातळ राहते. जेवढे उच्च दर्जाचे सिंथेटिक ऑइल तुम्ही इंजिन मध्ये वापराल तेवढच तुमचे इंजिन चांगले राहिल आणि गाडीच आयुष्य सुद्धा यामुळे वाढेल.













