Cheapest EV Cars In India : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
सध्या भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. तसेच अनेक कंपन्या आणखी नवीन इलेक्ट्रिक कार सादर करण्याच्या तयारीत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही.
मात्र तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि तुमचे बजेट कमी आहे तर काळजी करू नका. तुम्ही देखील भारतात काही स्वस्त इलेक्टिक कार उपलब्ध आहेत त्या खरेदी करू शकता. चला तर जाणून घेऊया भारतातील स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल..
MG Comet EV
तुम्हालाही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्ही MG Comet EV ही कार खरेदी करू शकता. या कारमध्ये 17.3kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच ही इलेक्ट्रिक सिंगल चार्जवर 230Km रेंज देण्यास सक्षम आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये रियर-व्हील ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, ही मोटर 42 Bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या कारची बॅटरी चार्जिंग होण्यासाठी 5-6 तास लागतात. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.98 लाख ते 9.98 लाख रुपये आहे.
Tata Tiago EV
टाटा टियागो ईव्ही ही एक देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.69 रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.99 लाख रुपयांपर्यंत जाते.
टाटा टियागो ईव्हीमध्ये दोन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. 19.2kWh आणि 24kWh चे बॅटरी पॅक देण्यात येतात. सिंगल चार्जमध्ये 250km आणि 315km रेंज देण्यास सक्षम आहेत.
Tata Nexon EV
टाटा मोटर्सकडून त्यांची सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये 30.2kWh लिथियम आयन पॉलिमर बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
citroen ec3
Citroën कंपनीकडून त्यांची स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. Citroën EC3 असे त्या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11.50 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.76 लाख रुपये आहे. या कारमध्ये 29.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात येतो. सिंगल चार्जमध्ये 320 किमीची रेंज देण्यास सक्षम असलेली ही इलेक्ट्रिक कार तुम्ही देखील तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
टाटा टिगोर इ.व्ही
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक क्षेत्रात मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या अनेक कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर केल्या आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.49 लाख ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.75 लाख रुपये आहे. या कारमध्ये 26 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात येतो.