Citroen Aircross X SUV महागली; काही व्हेरिएंट्सवर 45 हजारांपर्यंत दरवाढ, जाणून घ्या नवी किंमत

Published on -

Citroen Aircross X SUV : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सातत्याने दरवाढीचे सत्र सुरू असून आता सिट्रोएननेही आपल्या लोकप्रिय SUV Citroen Aircross X च्या किमतीत वाढ केली आहे. फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएनने ही दरवाढ अधिकृतपणे जाहीर केलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे. देशभरात ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली असून वेगवेगळ्या व्हेरिएंट्सनुसार किमतीत बदल करण्यात आला आहे.

Citroen Aircross X च्या किमतीत किती वाढ?

रिपोर्ट्सनुसार Citroen Aircross X SUV च्या किमतीत कमाल 45 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र ही वाढ सर्व व्हेरिएंट्ससाठी समान नाही. काही टॉप व्हेरिएंट्सवर मोठी दरवाढ करण्यात आली असून एंट्री आणि मिड व्हेरिएंट्सवर तुलनेने कमी वाढ लागू करण्यात आली आहे.

कोणत्या व्हेरिएंट्सवर किती दरवाढ?

मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणाऱ्या Turbo Max 7S Dual Tone, Turbo Max 7S तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या Max 7S आणि Max 7S Dual Tone या व्हेरिएंट्सच्या किमतीत सुमारे 45 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे U5S, Plus 5S आणि Plus 7S या व्हेरिएंट्सच्या किमतीत अंदाजे 20 हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे.

वाढीनंतर Citroen Aircross X ची नवी किंमत किती?

कंपनीकडून अधिकृत प्राइस लिस्ट जाहीर करण्यात आलेली नसली, तरी दरवाढीनंतर Citroen Aircross X ची एक्स-शोरूम किंमत आता सुमारे 8.49 लाख रुपयांपासून सुरू होत असल्याचे सांगितले जात आहे. तर या SUV च्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 14.14 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

ग्राहकांवर काय परिणाम?

लग्नसराई आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दरवाढ थोडीशी खिशाला चटका देणारी ठरू शकते. मात्र दमदार इंजिन, आकर्षक डिझाइन, 5-सीटर आणि 7-सीटर पर्याय तसेच आधुनिक फीचर्समुळे Citroen Aircross X अजूनही SUV सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय मानली जाते.

दरम्यान, आगामी काळात इतर कंपन्यांकडूनही वाहनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ग्राहकांनी खरेदीपूर्वी नवीन किंमत यादी तपासण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe