सीएनजी गाड्यांचे मायलेज वाढवण्यासाठी ‘ही’ एक ट्रिक युज करा ! ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, गाडी देणार जबरदस्त मायलेज

Ahmednagarlive24 office
Published:

CNG Car Mileage Increase : अलीकडे भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये पहिले आणि महत्त्वाचे कारण आहे केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना दिलेले प्रोत्साहन. केंद्र शासनाने वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आजच्या काळात नागरिकांच्या माध्यमातूनही इलेक्ट्रिक वाहनांना विशेष प्रेम दाखवले जात आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जरी देशात वाढला असला तरी देखील अजूनही देशात अनेक लोक सीएनजी कार खरेदी करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत. सीएनजी कार वापरणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे सीएनजी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे.

सीएनजी कारला अधिक मायलेज असल्याने या कारला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. मात्र CNG गाडीची देखभाल करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरून तुमची कार चांगले मायलेज देईल. हिवाळ्यात सीएनजी कारची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे केले नाही तर तुमच्या कारचे मायलेज कमी होऊ शकते.

सीएनजी कारच्या चांगल्या मायलेजसाठी काय करणार

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन CNG कारमध्ये ऑटो फीचर आहे जे इंजिन स्टार्ट करताना आपोआप पेट्रोलवर सुरू होते आणि जेव्हा कार 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास करते तेव्हा ती CNG वर जाते. पण जुन्या गाड्यांमध्ये हे वैशिष्ट्य नाही, त्यांनी नेहमी पेट्रोलवरच इंजिन सुरू करावे, असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.

तसेच स्पार्क प्लग आणि एअर फिल्टर हे देखील कारमधील इंजिनचे दोन आवश्यक भाग आहेत. पेट्रोल कारपेक्षा सीएनजी कारमध्ये स्पार्क प्लग लवकर बदलले पाहिजेत. सोबतच एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे.
सीएनजी किट बसवताना एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या.

किट नेहमी अधिकृत ठिकाणाहून स्थापित करा. आणि विद्युत तारांशी छेडछाड करणे टाळा. यासह, नेहमी त्या कंपनीचे किट निवडा जे तुमच्या कार ब्रँडच्या इंजिनला सपोर्ट करते. यामुळे कार चालत असताना इंजिनवरील दबाव कमी होईल आणि मायलेज वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe