CNG Car Tips : सीएनजी कार धारकांनो सावधान! या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, होईल मोठे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:
CNG Car Tips

CNG Car Tips : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेकजण नवीन कार खरेदी करताना सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. कारण सीएनजी कारच्या किमती देखील कमी आहेत आणि त्या मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहेत.

सीएनजी कारचे मायलेज अधिक असल्याने अनेकजण त्यांना पसंती देत आहेत. मात्र सीएनजी कार वापरताना अनेकजण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच काही वेळा मोठे नुकसान देखील होत असते. सीएनजी कारला अनेकदा आग लागल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे खालील गोष्टी सतत तपासल्या पाहिजेत.

सीएनजी किट देखभाल

जर तुम्हीही सीएनजी कार वापरत असाल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये बाहेरून सीएनजी किट बसवले असेल तर त्याबद्दल अनेक गोष्टी पाहणे गरजेचे आहे. तुमच्या कारच्या सीएनजी किटमध्ये इंजेक्टर असते त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गळती तपासा

तुमच्या सीएनजी कारमध्ये गॅस गळती होत आहे का हे तपासणे हे देखील गरजेचे आहे. जर गॅस गळती होत असेल तर त्वरित त्याची दुरुस्ती करणे देखील गरजेचे आहे. गाडीचे सिलिंडर आणि इंजेक्टर वेळोवेळी तपासले पाहिजेत. जर कारचा गॅस गळती होत असेल तर तुमच्या कारला आग देखील लागू शकते.

टायरची हवा तपासा

कार चालवताना तुम्हाला सर्वात प्रथम कारच्या टायरमध्ये हवा तपासणे गरजेचे आहे. कारण जर तुमच्या कारच्या टायरमध्ये हवा कमी असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुमच्या कारचे मायलेज देखील कमी होईल.

कार सर्व्हिसिंग

जर तुम्ही तुमच्या कारची सर्व्हिसिंग वेळेवर केली नाही तर तुमच्या कारमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर तुमच्या कारच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe