Nexon, Brezza ला टक्कर देणाऱ्या ‘या’ SUV वर मिळतोय 100000 रुपयांचा डिस्काउंट ! 

Published on -

Discount Offer : तुमचेही नवीन कार घेण्याचे स्वप्न आहे का? मग आता तुमचे हे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांकडून आता आपल्या लोकप्रिय गाड्यांवर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. खरे तर गेल्या महिन्यात सरकारने जीएसटी कपातीची घोषणा केली होती.

GST 2.0 ची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर छोट्या गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. छोट्या गाड्यांवरील जीएसटी आता 18% करण्यात आला आहे. सदर निर्णयामुळे बाजारात कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय.

यामुळे येत्या दिवाळीत ज्यांना नवीन गाडी खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. अशातच आता आघाडीची कार उत्पादक कंपनी कियाने ऑक्टोबर महिन्यात विविध मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे.

कंपनी त्यांच्या नवीन एसयूव्ही किआ सायरोसवर देखील मोठा डिस्काउंट देत आहे. या गाडीवर ग्राहकांना एक लाख रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. या ऑफरमध्ये ग्राहकांना 35 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे.

तसेच इतर पण अनेक फायदे दिले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे पैसे वाचणार आहेत. पण ऑफरबाबत डीलरशिपसोबत संपर्क साधायला हवा.आता आपण या गाडीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

गाडीचे फीचर्स कसे आहेत 

12.3 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

कारमध्ये चारही सीटसाठी व्हेंटिलेशन

अॅम्बियंट लाइटिंग

सेंटर आर्मरेस्ट

पॅनोरॅमिक सनरूफ

पॉवर ड्रायव्हर सीट आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक

एसयूव्हीमध्ये फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 

360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 एडीएएस 

वर्टिकलं एलईडी हेडलाइट्स

17-इंच अलॉय व्हील्स

फ्लश-फिटिंग डोअर हँडल 

कसे आहेत कलर ऑप्शन्स?

ऑरोरा ब्लैक पर्ल

फ्रॉस्ट ब्लू

ग्लेशियर व्हाइट पर्ल

ग्रेविटी ग्रे

इंपीरियल ब्लू

इंटेंस रेड

प्यूटर ऑलिव 

स्पार्कलिंग सिल्वर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe