Mahindra च्या ‘या’ कार्सवर वर्षातील सर्वात मोठी ऑफर! मिळवा चार लाख रुपये पर्यंत सूट… पुन्हा नाही येणार अशी संधी

महिंद्रा ऑटोमोटिव्हने फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्या विविध लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स अंतर्गत स्कॉर्पिओ, थार, XUV700, बोलेरो आणि XUV400 सारख्या गाड्यांवर 4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Discount On Mahindra Cars:- महिंद्रा ऑटोमोटिव्हने फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्या विविध लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स अंतर्गत स्कॉर्पिओ, थार, XUV700, बोलेरो आणि XUV400 सारख्या गाड्यांवर 4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

जी या वर्षातील सर्वात मोठी ऑफर मानली जात आहे. जर तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महिंद्राच्या या ऑफरचा फायदा घेत खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. चला या ऑफर्स आणि पूर्ण डिटेल्स जाणून घेऊया.

महिंद्राच्या या कार्सवर मिळत आहे सवलत

महिंद्रा स्कॉर्पिओ 

महिंद्रा स्कॉर्पिओ ही भारतीय बाजारातील सर्वाधिक मागणी असलेली एसयूव्हींपैकी एक आहे. तिची मजबूती, दमदार इंजिन आणि प्रीमियम लुक यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातही ही गाडी मोठ्या प्रमाणात पसंतीस पडते. भारतात महिंद्रा स्कॉर्पिओची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.62 लाख रुपये असून टॉप-एंड व्हेरिएंटसाठी ही किंमत 17.50 लाख रुपयांपर्यंत जाते.

कंपनी फेब्रुवारी 2025 मध्ये या मॉडेलवर 1.25 लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट देत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश असू शकतो.

महिंद्रा थार – 

महिंद्रा थार ही ऑफ-रोडिंगसाठी प्रख्यात असलेली एसयूव्ही आहे आणि ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तिची डिझाइन, मजबूती आणि पॉवरफुल इंजिनमुळे ती अनेकांची पहिली पसंती आहे.

थारची किंमत व्हेरिएंटनुसार 11.50 लाख ते 17.60 लाख रुपयांदरम्यान आहे. महिंद्रा या मॉडेलवर फेब्रुवारी महिन्यात १.२५ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.जी ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी एक उत्तम संधी आहे.

महिंद्रा XUV700 – 

महिंद्राची XUV700 ही आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली एक प्रीमियम एसयूव्ही आहे.जी ऑटोमेटिक आणि मॅन्युअल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीमध्ये ADAS (Advanced Driver Assistance System), ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरामिक सनरूफ आणि अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत.

XUV700 ची किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ती 26.04 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी फेब्रुवारी महिन्यात या एसयूव्हीवर 1 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट देत आहे. याशिवाय काही व्हेरिएंट्सवर 20000 ते 5000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे.

महिंद्रा बोलेरो – 

ग्रामीण आणि शहरी भागात प्रचंड मागणी असलेली महिंद्रा बोलेरो ही एसयूव्ही मजबूत डिझाइन आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. बोलेरोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 10.91 लाख रुपये आहे. फेब्रुवारी महिन्यात महिंद्रा या गाडीवर 1.4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे, जी व्हेरिएंटनुसार 65000 ते 1 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

महिंद्रा XUV400 EV – 

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महिंद्राची XUV400 ही बाजारात महत्त्वाची इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरत आहे. ही गाडी दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असून 37.7 kWh आणि 39.4 kWh क्षमतेच्या बॅटरींसह येते.

तिची किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात महिंद्रा या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तब्बल 4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी आहे.

या ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा?

महिंद्राच्या या सवलती मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक ग्राहकांनी लवकरात लवकर त्यांच्या जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट देऊन या ऑफर्सचा लाभ घ्यावा.

सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू असू शकतात.जसे की, विशिष्ट व्हेरिएंटसाठीच ऑफर लागू असेल किंवा एक्सचेंज बोनससाठी जुन्या वाहनाची स्थिती आणि कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक असेल.

संधीचे सोने करा

महिंद्रा ऑटोमोटिव्हच्या फेब्रुवारी 2025 मधील या आकर्षक ऑफर्समुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या एसयूव्ही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात बचत करण्याची संधी मिळणार आहे.

स्कॉर्पिओ, थार, XUV700, बोलेरो आणि XUV400 सारख्या प्रीमियम वाहनांवर मिळणाऱ्या या सवलती गाडी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट द्या आणि या मर्यादित कालावधीतील ऑफर्सचा लाभ घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe