Diwali News : सरकारने 22 सप्टेंबर पासून जीएसटी 2.0 लागू केली आहे. या निर्णयामुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी झालाय. छोट्या वाहनांवरील जीएसटी देखील सरकारने कमी केला आहे. यामुळे कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नव्या निर्णयाचा मोठा फायदा मिळतोय.
या निर्णयानंतर सेकंड हॅन्ड गाड्यांच्या किमती सुद्धा कमी झाल्या आहेत. दरम्यान नव्या तसेच सेकंड हॅन्ड गाड्यांच्या किमती कमी झाल्या असल्याने याचा परिणाम आता विक्रीवर दिसून येतोय. किमती घटल्याने सर्वच कंपन्यांच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

जीएसटी कपातीमुळे आधीच गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत आणि त्यानंतर आता मारुती टाटा सारख्या कंपन्यांनी दिवाळी निमित्ताने बंपर डिस्काउंट ऑफर सुद्धा सुरू केली आहे. यातच आता होंडा कंपनीकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
होंडाने देखील दिवाळीच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. दरम्यान आज आपण अशा तीन गाड्यांबाबत माहिती पाहणार आहोत ज्यावर कंपनीकडून चांगला डिस्काउंट दिला जात आहे.
होंडा एलीवेट – कंपनीकडून या गाडीवर 1.51 लाखाचा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे ज्यांचे ही SUV खरेदी करण्याचे स्वप्न असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. दिवाळीत या गाडीच्या विक्रीमध्ये देखील मोठी वाढ होणार असल्याचा दावा केला जातोय. कंपनीच्या या ऑफरचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
सिटी – या गाडीवरही ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट मिळतोय. दिवाळीतील गाडी खरेदी केल्यास ग्राहकांची 1.27 लाख रुपयांची बचत होणार आहे.
अमेझ – या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना 98 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. नक्कीच कॉम्पॅक्ट सेडान ज्यांना खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा एक फायद्याचा पर्याय ठरू शकतो.