डोनाल्ड ट्रम्प विकणार एलोन मस्क यांनी गिफ्ट दिलेली Tesla Model S कार ! किती पैसे मिळणार ?

डोनाल्ड ट्रम्प यांनी एलोन मस्कच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करून Tesla Model S कार विकण्याचा निर्णय घेतला आहे. $80,000 किमतीची ही लक्झरी इलेक्ट्रिक कार मार्च 2025 मध्ये खरेदी झाली होती. ट्रम्प-मस्क वादामुळे ही कार लवकरच बाजारात येणार आहे.

Published on -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांच्यातील वाद आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी घेतलेली Tesla Model S ही लक्झरी इलेक्ट्रिक कार विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार त्यांनी मार्च 2025 मध्ये खरेदी केली होती आणि गेल्या अनेक आठवड्यांपासून ती व्हाईट हाऊस परिसरात पार्क केलेली होती.

या कारची खरेदी ट्रम्प यांनी एलोन मस्कच्या कंपनीला पाठिंबा देण्यासाठी केली होती. त्यांनी त्यावेळी स्पष्ट सांगितले होते की कारची पूर्ण किंमत भरून ती घेत आहेत आणि कोणतीही सवलत नको आहे. मात्र एलोन मस्क यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत ट्रम्प यांनी आता ही कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Tesla Model S ची किंमत

Tesla Model S ही कार सध्या भारतात उपलब्ध नाही, परंतु ती आंतरराष्ट्रीय बाजारात एक प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान म्हणून ओळखली जाते. ट्रम्प यांनी खरेदी केलेल्या या कारची किंमत सुमारे $80,000 आहे, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ₹68 लाख इतकी होते.

Tesla Model S मधील फीचर्स

या कारमध्ये 17 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 22-स्पीकर ऑडिओ सिस्टम, ट्राय-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखी अत्याधुनिक फीचर्स दिली आहेत. कार तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येते – Long Range, Plaid आणि Plaid Plus.

कंपनीचा दावा आहे की या कारची रेंज एका चार्जमध्ये 628 किमी ते 837 किमी पर्यंत असते, जी तिच्या श्रेणीत सर्वाधिक मानली जाते. Tesla Model S भारतात आल्यास तिची संभाव्य किंमत सुमारे ₹1.50 कोटी (एक्स-शोरूम) इतकी असू शकते. त्यामुळे ही कार लक्झरी सेगमेंटमध्ये महत्वाचे स्थान मिळवू शकते.

ट्रम्प आणि एलोन मस्क वाद

ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्यातील वादाचे मूळ ‘One Big Beautiful Bill Act’ या विधेयकात आहे. या विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहनांवरील करसवलती रद्द होणार आहेत, ज्यामुळे मस्कच्या कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते. यावरून मस्क संतप्त असून त्यांनी ट्रम्पवर निवडणुकीसाठी आपला वापर केल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांनीही स्पष्टपणे सांगितले की ते आता एलोन मस्कशी कोणतेही संवाद ठेवणार नाहीत कारण त्यांचा विश्वास उडालेला आहे. या राजकीय संघर्षाचा परिणाम म्हणून ट्रम्प आता आपल्या Tesla Model S ला अलविदा म्हणण्याच्या तयारीत आहेत. ही कार लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe