इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी गोड बातमी ! लाँच होणार ‘या’ 5 नवीन Electric Cars 

Published on -

Electric Car : तुम्हालाही नवीन कार घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. विशेषता ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक फायद्याची ठरणार आहे. कारण की लवकरच भारतीय कार मार्केटमध्ये आणखी काही नव्या गाड्या लॉन्च करण्यात येणार आहेत. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे.

त्यामुळे आता दिग्गज ऑटो कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्राधान्य देताना दिसत आहेत. 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांतच ईव्ही विक्रीने 1 लाख युनिट्सचा टप्पा पार केला आहे. नक्कीच ही एक मोठी गोष्ट आहे आणि यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.

खरंतर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे तसेच वाढत्या किमतीमुळे मोठ्या प्रमाणात होतोय. यासोबतच सरकारही इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकारकडून अनुदान दिले जात आहे सोबतच महाराष्ट्र राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापर करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोफत टोलची घोषणा सुद्धा केली आहे.

त्यामुळे अलीकडील काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली असून येत्या काळात बाजारात नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीला इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. या कंपनीच्या अनेक मॉडेल्स या सेगमेंट मध्ये धुमाकूळ घालताना दिसतायेत.

टाटा मोटर्सने आधीच नेक्सॉन ईव्ही, पंच ईव्ही आणि कर्व्ह ईव्ही सारख्या मॉडेल्सद्वारे बाजारात मजबूत स्थान निर्माण केले आहे. पण आता टाटा मोटरची ही मक्तेदारी खोडून काढण्यासाठी इतरही ऑटो कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. आता मारुती, टोयोटा आणि किया सारख्या कंपन्याही या रेसमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत.

येत्या काही महिन्यांत भारतीय बाजारात 5:मोठ्या आणि चर्चित इलेक्ट्रिक कार्स दाखल होणार आहेत. दरम्यान आता आपण पुढील काही महिन्यांमध्ये देशात कोणत्या नवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च होतील याबाबत माहिती पाहणार आहोत.

Kia Syros EV – किया मोटर्स मार्च 2026मध्ये Syros EV लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही SUV टाटा नेक्सॉन ईव्हीसोबत स्पर्धा करणार अशी माहिती दिली जात आहे. ही गाडी टेस्टिंगदरम्यान अनेक वेळा दिसली आहे. या मॉडेलमध्ये ग्रीन ब्रेक कॅलिपर्स आणि फ्रंट फेंडरवरील चार्जिंग पोर्ट आहेत. ही कार Hyundai Inster-बेस्ड K1 प्लॅटफॉर्मवर तयार होणार असून फ्रंट-व्हील ड्राइव्हसह येईल.

Hyundai Inster EV – ह्युंदाईची Inster EV सुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे. टाटा पंच ईव्हीला टक्कर देण्यासाठी ही गाडी बाजारात उतरवली जाईल. या SUV मध्ये 42kWh आणि 49kWh बॅटरीचे पर्याय असतील, ज्यामुळे 300 ते 355 किमी रेंज मिळेल. यात ड्युअल 10.25-इंच स्क्रीन, लेव्हल-2 ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स असतील.

Tata Sierra EV – टाटाची सर्वाधिक चर्चित Sierra EV, कंपनीच्या Curvv आणि Harrier EVच्या मध्ये पोजिशन केली जाईल. क्लासिक Sierra चा आधुनिक अवतार असलेली ही SUV तीन 12.3-इंच स्क्रीन आणि आकर्षक इंटीरियरसह येईल.

Toyota Urban Cruiser EV – टोयोटाची ही SUV प्रत्यक्षात मारुती e-Vitara ची ट्विन सिस्टर आहे. दोन्ही मॉडेल्स एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असून समान बॅटरी आणि पॉवरट्रेन वापरणार आहेत.

Maruti e-Vitara – मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV e-Vitara 49kWh आणि 61kWh बॅटरी पर्यायांसह सुमारे 500 किमी रेंज देईल. यात वेंटिलेटेड सीट्स, ADAS आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीसारखी आधुनिक फिचर्स असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News