Electric Cars News : फक्त एवढ्या पैशात Kia EV6 कार बुक करा, मात्र बुकिंग रद्द केल्यास होणार मोठे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Cars News : भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली असून अनेकजण या गाड्यांच्या खरेदीला पुढे आले आहेत. आता नुकतीच Kia भारताची पहिली इलेक्ट्रिक कार Kia EV6 २ जून रोजी भारतात प्रवेश करेल.

विशेष बाब म्हणजे Kia EV6 इलेक्ट्रिक कारचे फक्त १०० युनिट्स भारतात सादर केले जातील. या १०० गाड्या पूर्णपणे बिल्ट युनिट (Built unit) -CBU म्हणून येतील. म्हणजेच ते आयात करून भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत.

तुम्ही Kia EV6 इलेक्ट्रिक कार 3 लाख रुपयांमध्ये बुक करू शकता. ही इलेक्ट्रिक कार देशातील १२ शहरांमधील १५ निवडक डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते. कंपनीच्या www.kia.com या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्वतःची नोंदणी (Registration) करून कार बुक करू शकता.

तुम्ही बुकिंग केल्यानंतर Kia EV6 खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तुमचे बुकिंग रद्द करावे लागेल आणि बुकिंग रद्द करण्यासाठी 50,000 कॅन्सलेशन शुल्क आकारले जाईल. म्हणजेच बुकिंग रद्द केल्यावर ३ लाखांऐवजी केवळ 2.5 लाख रुपयेच मिळतील.

सिंगल चार्जमध्ये 528 किमी

Kia EV6 कंपनीच्या समर्पित EV प्लॅटफॉर्म e-GMP वर आधारित आहे. दावा केला जात आहे की, ही कार एका चार्जवर 500 किलोमीटरहून अधिक धावू शकते. हे 350KWh चार्जरसह केवळ १८ मिनिटांत ८० टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की ही इलेक्ट्रिक कार केवळ 5.2 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.

नवीन Kia इलेक्ट्रिक कार 77.4kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह GT-Line ट्रिममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. सुरक्षेसाठी या कारमध्ये 8 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेक असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असेंट कंट्रोल आणि डिस्क ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात Kia EV6 इलेक्ट्रिक कार 6 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये स्टील मॅट ग्रे, व्हाइट पर्ल, मिडनाईट ब्लॅक, रनवे रेड, इंटरस्टेलर ग्रे, यॉट्स ब्लू आणि स्टील मॅट ग्रे यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe