Electric Cars: इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात सध्या खूप पसंती मिळत आहे. तरी आजही इलेक्ट्रिक कारच्या किंमती पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. पण असे असूनही, कंपन्या यामध्ये सातत्याने नवीन गाड्या सादर करत आहेत. सध्या देशभरात फक्त 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत जी 10 लाख ईव्हीची सेवा देतात.
मार्केट इंटेलिजेंस फर्म JATO Dynamics च्या आकडेवारीनुसार, 2023 च्या अखेरीस, 10 पेक्षा जास्त कार निर्माते 20-25 Electric Cars लाँच करतील, ज्यात 7.5 लाख ते 2 कोटी रुपयांच्या श्रेणीतील कार असतील. JATO Dynamics च्या मते, 2022 मधील काही इलेक्ट्रिक कार्स म्हणजे Tata Altroz EV, Mahindra eKUV100, MG ZS EV, Mercedes Benz EQS sedan, Volvo XC40 Recharge, Ford Mustang Mach E आणि Kia EV6 आहेत. दरम्यान, Mahindra & Mahindra (M&M) कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की कंपनी 15 ऑगस्ट 2022 रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक सादर करेल.


Volvo X40 रिचार्जची अंदाजे किंमत 65,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: सप्टेंबर 2022
Mahindra eKUV 100 ची अंदाजे किंमत रु.8,00,000 असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: सप्टेंबर 2022
Tata Altroz EV ची अंदाजे किंमत 14,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: सप्टेंबर 2022
Hyundai Kona फेसलिफ्टची अंदाजे किंमत 25,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख:सप्टेंबर 2022
Hyundai Iconic 5 ची अंदाजे किंमत रु.60,00,000 असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: डिसेंबर 2022
Ford Mustang Match E ची अंदाजे किंमत 70,00,000 रुपये आहे.
अंदाजे लॉन्च तारीख: डिसेंबर तिमाही 2022

मर्सिडीज-बेंझ EQS ची अंदाजे किंमत रु. 1,75,00,000 असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: डिसेंबर 2022
मर्सिडीज-बेंझ EQA ची अंदाजे किंमत 60,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: डिसेंबर 2022
टेस्ला मॉडेल 3 ची अंदाजे किंमत 60,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: डिसेंबर 2022
टेस्ला मॉडेल Y ची अंदाजे किंमत 70,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: डिसेंबर 2022
Skoda Inyak IV ची अंदाजे किंमत रु. 60,00,000 असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: मार्च 2023
Mahindra EXUV 300 ची अंदाजे किंमत 15,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: मार्च 2023
BMW IX1 ची अंदाजे किंमत 2,00,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: मार्च 2023
टेस्ला मॉडेल X ची अंदाजे किंमत 1,50,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: मार्च2023
टेस्ला मॉडेल एस ची अंदाजे किंमत 14,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: मार्च 2023
टाटा सिएराची अंदाजे किंमत 6,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लाँच तारीख: मार्च 2023
Tata Tiago EV ची अंदाजे किंमत 14,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: सप्टेंबर 2023
Mercedes-Benz EQ SUV ची अंदाजे किंमत 2,00,00,000 रुपये असू शकते.
अंदाजे लॉन्च तारीख: जून 2023
Audi Q4 e-tron ची अंदाजे किंमत रु. 80,00,000 आहे.
अंदाजे लाँच तारीख: मार्च 2023