Tata Altroz Discount Offer:- टाटा मोटर्सने त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजवर मोठी सूट जाहीर केली आहे. जी १ लाख रुपयांपर्यंत असू शकते. ही सूट विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक क्लियर करण्याच्या उद्देशाने दिली जात आहे आणि त्यात ८५,००० रुपयांची रोख सूट आणि १५,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर समाविष्ट आहे.
मात्र ही सूट फक्त जुन्या मॉडेलवर लागू आहे.त्यामुळे जर तुम्ही नवीन मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कोणतीही सूट मिळणार नाही. टाटा अल्ट्रोजची एक्स-शोरूम किंमत ६.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. जी त्याच्या दर्जा आणि वैशिष्ट्यांच्या तुलनेत खूप आकर्षक आहे.
Tata Altroz मधील इंजिन पर्याय
अल्ट्रोज विविध इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.ज्यात १.२ लिटर पेट्रोल, १.२ लिटर टर्बो पेट्रोल, १.५ लिटर डिझेल आणि सीएनजी वेरियंट समाविष्ट आहेत. या इंजिन्सला ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ड्युअल क्लच ऑटो (DCA) ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह पर्याय दिले जात आहेत. मायलेजच्या बाबतीत, १.२ लिटर पेट्रोल इंजिन १८ ते २५ किमी/लीटर मायलेज देऊ शकते.जे इतर हॅचबॅक कार्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. रेसर आवृत्तीत १.२ लिटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिन आहे. जे १२० पीएस पॉवर आणि १७० एनएम टॉर्क जनरेट करते आणि ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.
कसे आहे डिझाईन?
डिझाइनच्या बाबतीत टाटा अल्ट्रोज आधुनिक आणि आकर्षक डिझाइनसह येते जरी काही भारतीय ग्राहकांना त्याची रचना पूर्णपणे आकर्षक वाटत नसेल. तथापि, यात असलेल्या अंतर्गत जागेची कमतरता नाही आणि कुटुंबासाठी ही एक उत्तम कार ठरते. त्याची गुणवत्ता देखील खूप चांगली आहे आणि तुम्ही टाटा अल्ट्रोज खरेदी केल्यास तुम्हाला फिचर्स आणि आरामदायक अनुभव मिळेल. याशिवाय, रेसर आवृत्तीमध्ये १६ इंचाचे टायर्स आणि अधिक पॉवरफुल इंजिन दिले गेले आहे. ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक रोमांचक होतो.
तुम्ही जर प्रीमियम हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटा अल्ट्रोजवरील १ लाख रुपयांची सूट एक उत्तम संधी आहे. या कारचे इंजिन,डिझाइन आणि मायलेजच्या बाबतीत असलेली उत्कृष्टता, तिच्या किमतीनुसार या कारला आकर्षक पर्याय बनवते.