Hyundai Inster EV चे फीचर्स आले समोर, थेट टाटाच्या ‘या’ कारला देईल टक्कर…

Content Team
Published:
Hyundai Inster EV

Hyundai Inster EV : सध्या ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. ईव्ही कारची मागणी पाहता अनेक कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. ईव्हीची विक्री आणि क्रेज पाहता ह्युंदाईने नुकतेच आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. कंपनीने आपली नवीन EV Hyundai Inster सादर केली आहे जी कंपनीच्या स्वतःच्या Hyundai Casper वर आधारित आहे.

Hyundai ची ही कार लॉन्च होताच टाटा पंच EV सारख्या जबरदस्त कारला थेट टक्कर देऊ शकतात, जी सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित इलेक्ट्रिक कार मानली जाते. Hyundai Inster EV चे डिझाईन खूपच आकर्षक आहे. तसेच त्यातील फीचर्स देखील खूप खास आहेत.

या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये पाहिली तर, Hyundai ने त्याच्या फ्रंट-एंडमध्ये LED डेटाइम रनिंग लाइट्स आणि पिक्सेल-ग्राफिक टर्न सिग्नल दिले आहेत. या कारच्या टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये 17-इंच चाके आहेत जी लहान कारमध्ये यापूर्वी दिसली नव्हती. एवढेच नाही तर Hyundai Inster EV मध्ये 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंग आणि वन-टच सनरूफ, 64 रंगीत एलईडी ॲम्बियंट लाईट्स यांसारखे आधुनिक फिचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत.

इंजिन

कंपनीने 42kWh आणि 49kWh बॅटरी पर्यायांसह Hyundai Inster EV इंजिन लाँच केले आहे. या कारच्या बेस व्हेरिएंटमध्ये 71.1 kW ची मोटर आहे जी 97 PS पॉवर आणि 147 Nm टॉर्क निर्माण करते. दुसऱ्या मॉडेलमध्ये 84.5 kW ची मोटर बसवली आहे जी 115 PS पॉवर आणि 147 Nm टॉर्क जनरेट करते.

या व्यतिरिक्त जर रेंजबद्दल बोलायचे झाले तर, एकदा फुल चार्ज झाल्यावर Hyundai Inster EV 355 किमी पर्यंत धावू शकते, म्हणजेच याला 355 किमीची जबरदस्त रेंज देण्यात आली आहे. याशिवाय, बॅटरी चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील आहे, ज्याच्या मदतीने ही कार फक्त 10 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. या इलेक्ट्रिक कारमध्ये V2L म्हणजेच व्हेईकल टू लोड ची सुविधा देखील देण्यात आली आहे.

कधी होईल लॉन्च

मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai आपली नवीन Inster EV प्रथम कोरियामध्ये लॉन्च करणार आहे. त्यानंतर ही कार युरोप, मध्य पूर्व आणि आशिया पॅसिफिकमध्ये लॉन्च केली जाईल. Hyundai Casper च्या तुलनेत ही कार अनेक देशांमध्ये पोहोचणार आहे. मात्र त्याच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe