Kia Carens EV | भारतीय बाजारपेठेत 7-सीटर एमपीव्ही गाड्यांचा खूप मोठा ग्राहक वर्ग आहे आणि या सेगमेंटमध्ये Kia Carens ने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मारुती एर्टिगा नंतर ही गाडी सेगमेंटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही ठरली आहे. याच यशानंतर Kia Motors आता Carens चे फेसलिफ्ट मॉडेल 2025 मध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार ही गाडी 8 किंवा 9 मे 2025 रोजी लाँच होऊ शकते.
नवीन Kia Carens फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक नवे बदल आणि अपडेट्स पाहायला मिळणार आहेत. यात EV व्हर्जन देखील लाँच होणार असून दोन्ही प्रकारांमध्ये स्टाईल आणि टेक्नोलॉजीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नवीन डिझाइनमध्ये त्रिकोणी LED हेडलाइट्स, कनेक्टेड DRLs, नविन फ्रंट आणि रियर बंपर तसेच फुल-व्हिड्थ टेललाइट्स दिसतील. याशिवाय, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बंद ग्रिल आणि एरोडायनामिक अलॉय व्हील्स देखील दिले जातील.

इंटीरियर
इंटीरियरच्या बाबतीतही Kia Carens फेसलिफ्टमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन डॅशबोर्ड डिझाइन, रंगीत सीट अपहोल्स्ट्री, आणि EV वर्जनमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे.
ड्युअल-स्क्रीन सेटअप (12.3-इंच), ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ, 6 एअरबॅग्स, ESC, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स आणि Level-2 ADAS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये ग्राहकांना आकर्षित करतील.
बॅटरी पॅक व किंमत
इंजिन पर्यायांमध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल यांचा समावेश आहे. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड iMT, 7-स्पीड DCT आणि 6-स्पीड AT चे पर्याय दिले जातील.
इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये 400 ते 500 किमी रेंजचे वेगवेगळे बॅटरी पॅक असतील. या नव्या फेसलिफ्ट गाडीची सुरुवातीची किंमत सुमारे ₹11.50 लाख इतकी असू शकते.
जर तुम्ही सध्या एर्टिगा किंवा इनोव्हा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबून Kia Carens चा फेसलिफ्ट किंवा EV व्हर्जन एकदा पाहूनच निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.