Mahindra XUV700 | भारतीय SUV बाजारात महिंद्रा सतत आकर्षक ऑफर्ससह ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. एप्रिल 2025 मध्ये कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV मॉडेल XUV700 वर तब्बल ₹100000 पर्यंतची सवलत जाहीर केली आहे. ही सवलत फक्त MY2024 मॉडेलवर लागू असून, ही ऑफर केवळ एप्रिल अखेरपर्यंतच वैध आहे. त्यामुळे जे ग्राहक XUV700 खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये महिंद्राने या मॉडेलच्या 7,468 युनिट्स विक्री करून XUV700 ला तिसऱ्या क्रमांकावर नेलं आहे. ही आकडेवारी SUV च्या प्रचंड लोकप्रियतेचा पुरावा आहे.

इंजिन व परफॉर्मन्स-
XUV700 मध्ये दोन दमदार इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहेत – 2.0-लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल. पेट्रोल इंजिन 200 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क तर डिझेल इंजिन 185 bhp पॉवर आणि 450 Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन्स SUV ला दमदार परफॉर्मन्स देतात आणि विविध रस्त्यांवर उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देतात.
या SUV च्या केबिनमध्ये मिळणारं टेक्नॉलॉजीचं जबरदस्त कॉम्बिनेशनही लक्षवेधी आहे. यात 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सारखी फीचर्स मिळतात. SUV मध्ये 7 एअरबॅग्ज आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत.
किंमत-
महिंद्रा XUV700 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹13.99 लाख आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत ₹26.99 लाखांपर्यंत जाते. उत्कृष्ट फीचर्स, ताकदवान इंजिन आणि आता मोठी सूट मिळत असल्याने XUV700 सध्या बाजारात एक चांगला पर्याय ठरतो आहे.