खुशखबर ! टाटा हॅरियरवर मिळतेय बंपर सूट, अशी संधी पुन्हा येणार नाही

जर तुम्ही हॅरियर खरेदीचा विचार करत असाल, तर एप्रिलमध्ये यावर तब्बल 75,000 पर्यंतची सूट दिली जाणार आहे. तसेच ही SUV लवकरच इलेक्ट्रिक रूपातही लॉन्च होणार आहे. या ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊयात-

Updated on -

Tata Harrier | भारतीय ग्राहक SUV खरेदी करताना सध्या टाटा हॅरियर (Tata Harrier) कडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. एप्रिल 2025 मध्ये ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय SUV हॅरियरवर 75,000 पर्यंतची सूट जाहीर केली आहे.

ही ऑफर रोख डिस्काउंट, एक्सचेंज बोनस स्वरूपात दिली जात आहे. ही ऑफर काही काळासाठी मर्यादित आहे, त्यामुळे ज्यांना हॅरियर खरेदी करायची आहे त्यांनी लवकर निर्णय घेणे यामुळे गरजेचे आहे, या ऑफर सह, कंपनी लवकरच टाटा हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट देखील लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता डिझेल मॉडेलवर डिस्काउंट कंपनी देते आहे.

Tata Harrier इंजिन आणि मायलेज

टाटा हॅरियरची वैशिष्ट्ये पाहिल्यास, ही SUV 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. यात 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे जे 170 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करतं. गिअरबॉक्ससाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिकचे पर्याय उपलब्ध आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की मॅन्युअल व्हेरिएंट 16.80 km/l तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 14.60 km/l मायलेज देते. हॅरियरला Bharat NCAP ने क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग दिलं आहे.

Tata Harrier फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचं झाले तर ही SUV अन्य मॉडेल्सपेक्षा सरस आहे. यात 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10-स्पीकर साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, आणि पॅनोरॅमिक सनरूफ आहे. सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ADAS फीचर्स दिले आहेत.

Tata Harrier किंमत किती आहे ?

भारतीय SUV बाजारात टाटा हॅरियर महिंद्रा XUV700 सारख्या गाड्यांशी स्पर्धा करते. हॅरियरची किंमत 15 लाखांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी ₹26.50 लाखांपर्यंत जाते. जर तुम्ही हॅरियर खरेदीचा विचार करत असाल, तर एप्रिलमध्ये देण्यात येणारी ही सूट तुमच्यासाठी उत्तम संधी असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe