खुशखबर ! बाजारात लवकरच लॉन्च होणार टोयोटा ची स्वस्त फॉर्च्यूनर कार ? कसे असतील फिचर्स ? वाचा..

Ahmednagarlive24 office
Published:

Cheapest Fortuner Car Toyota : टोयोटा ही देशातील एक नामांकित ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. कंपनीच्या फोरचुनर कारची तर भारतात मोठी क्रेज पाहायला मिळते. ही गाडी तरुण वर्गामध्ये विशेष लोकप्रिय आहे.

दरम्यान टोयोटा कंपनीने जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये भविष्यातील कन्सेप्ट कारचा संग्रह जगासमोर ठेवला आहे. या कार कलेक्शनमध्ये अनेक भविष्यातील कन्सेप्ट कारचे दर्शन घडले आहे. विशेष म्हणजे या कन्सेप्ट कार कलेक्शनने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

सध्या या कार कलेक्शनची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. यापैकी IMV 0 संकल्पनेने लोकांना सर्वाधिक आकर्षित केले असल्याचे चित्र आहे. IMV (इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल मल्टीपर्पज व्हेईकल) आर्किटेक्चर टोयोटाच्या हिलक्स आणि फॉर्च्युनरसह अनेक प्रतिष्ठित युटिलिटी वाहनांना अधोरेखित करत आहे.

टोयोटा फॉर्च्युनरचे स्वस्त प्रकार जपान मोबिलिटी शोमध्ये पूर्वावलोकन केलेल्या IMV 0 प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे. याच गाडीचे तपशील आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

स्वस्तातली टोयोटा फॉर्च्युनर लवकरच येणार टोयोटा फॉर्च्युनरची लोकप्रियता भारतीय बाजारपेठेत किती आहे हे आम्ही सांगण्याचे काही कारण नाही. या गाडीची क्रेझ भारतात खूपच अधिक आहे. जवळपास प्रत्येकाचेच ही गाडी खरेदी करण्याचे स्वप्न आहे. मात्र या गाडीची किंमत ही खूपच अधिक आहे.

यामुळे सर्वसामान्यांना इच्छा असूनही ही गाडी खरेदी करता येत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. विशेष बाब म्हणजे या गाडीच्या किमती गेल्या काही वर्षांत अगदी आकाशाला गवसणी घालत आहेत असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.

मात्र गाडीची किंमत अधिक असली तरी देखील फॉर्च्युनरची चांगल्या संख्येने विक्री सुरू असल्याचे चित्र सध्या भारतीय बाजारात पाहायला मिळत आहे. अनेक लोक किंमत अधिक असली तरी देखील सुरक्षित गाडी म्हणून या गाडीच्या खरेदीला पसंती दाखवतात.

दरम्यान सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेली ही कार आता लवकरच स्वस्तात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. लवकरच टोयोटा कंपनी स्वस्तातील फॉर्च्यूनर लॉन्च करायला असे वृत्त मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहेत.

याबाबत मात्र कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर कंपनी लवकरच स्वस्तातली फॉर्च्युनर कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेसिसच्या मॉड्युलर डिझाईनपासून प्रेरित टोयोटाची परवडणारी SUV बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

सध्याच्या फॉर्च्युनरच्या विपरीत, IMV 0 प्लॅटफॉर्मवर आधारित मॉडेलमध्ये काही प्रीमियम वैशिष्ट्ये दिसणार नाहीत. काही रिपोर्टनुसार टोयोटा सध्या IMV 0 मध्ये SUV प्रकल्प विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe