Apache प्रेमींना खुशखबर ! लवकरच येतेय Apache RTR 160 4V चे नवीन अपडेटेड व्हर्जन, जबरदस्त असतील फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Apache RTR 160 4V

Apache RTR 160 4V : सध्या स्पोर्टी वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे. विवीध कंपन्या मार्केटमध्ये आपल्या स्पोर्टी बाईक आणण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान TVS ची Apache ही बाईक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

आता या बाईक प्रेमींसाठी खुशखबर आहे. TVS ने आपली हायस्पीड बाइक Apache RTR 160 4V ची नवीन अपडेटेड व्हर्जन बाईक लॉन्च केली आहे. यामध्ये अनेक गोष्टी अपडेट केल्या आहेत. त्याचा फ्रंट लुक अधिक आकर्षक करण्यात आला आहे.

यात ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. बाइकमध्ये 240 मिमी रियर डिस्क ब्रेक दिला गेला आहे. या बाईकची किंमत 1.34 लाख रुपये दरम्यान असणार आहे. विशेष म्हणजे ही बाईक इतकी जबरदस्त असणार आहे की या बाईकमध्ये पूर्वीपेक्षा 17.6 hp जास्त पॉवर मिळेल.

बाईकविषयी सविस्तर माहिती :

शनिवारी गोव्यात Motosoul 2023 मध्ये या बाईकचे अनावरण करण्यात असून या बाईकच्या डिलिव्हरी डेट बाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या बाइकमध्ये स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे तीन मोड असणार आहेत.

ही बाईक लाइट ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे. सध्या मार्केटमध्ये जी TVS Apache RTR 160 4V आहे ती सिंगल डिस्क आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह आलेली आहे. सध्या या बाईकचे चार व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. यात 159.7cc इंजिन आहे.

सध्या मार्केटमध्ये जी बाईक आहे ती 17.3 bhp ची पॉवर आणि 14.73 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 12 लीटरची फ्युएल टॅंक असून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि अलॉय व्हील्स आहेत. बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स असल्याने या बाईकचा परफॉर्मन्स अगदी हाय आहे.

 तरुणांमध्ये क्रेझ

Apache बाईकची एक वेगळीच क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. तरुण वर्ग जास्त करून या बाईककडे आकर्षित होताना दिसत आहे. बाईकचा लूक, स्पीड, फीचर्स यामुळे ही बाईक शायनिंग बाईक वाटते. त्यात आता जी नवीन बाईक आली आहे ते अपडेटेड व्हर्जन तर अगदीच शानदार असणार आहे. Apache प्रेमींना जर बाईक खरेदी करायची असेल तर ही अत्यंत चांगली संधी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe