Electric Scooter : भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाइक्स यांचे मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये मोठे वाढले आहे. विशेष म्हणजे सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले आहे.
दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी ओला लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या माध्यमातून एक नवीन स्कूटरचे पेटंट बनवण्यात आले आहे.

दरम्यान आता आपण कंपनीच्या या आगामी स्कूटरचे डिझाईन कसे राहणार, याचे फिचर्स कसे राहणार याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. ओला इलेक्ट्रिकचे आगामी स्कूटर एक लहान आणि कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जें की विविध प्रकारच्या व्यावसायिक हेतूंसाठी डिझाइन केली गेली आहे. या गाडीची रचना पाहिल्यास, हे स्पष्ट होते की यात एक साधी ट्यूबलर चेसिस राहणार आहे.
आगामी ओला स्कूटरचा हँडलबारही साधा राहील अशी माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त, आगामी ओला स्कूटरमध्ये एलईडी क्लस्टर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याच वेळी, ओलाच्या या आगामी स्कूटरच्या सीटखाली बॅटरी बसवलेली आहे. आगामी ओला स्कूटरमध्ये विशेष प्रकारची स्वॅप करण्यायोग्य बॅटरी राहणार आहे.
दुसरीकडे, नव्याने लाँच होणाऱ्या स्कूटरच्या फिचर्सबद्दल बोललो, तर त्यात एकच तुकडा आणि अतिरिक्त कार्गोसाठी एक मोठा रॅक समाविष्ट राहण्याची शक्यता आहे. आगामी ओला स्कूटरमध्ये प्रोफाइल ट्यूबलेस टायर मिळू शकतात. यातील बॅटरी सुमारे 3 kWh असू शकते जी 150 किलोमीटरची रेंज देईल.
या सर्वांशिवाय ओला इलेक्ट्रिकच्या आगामी स्कूटरमध्ये रियर हब मोटर सुद्धा राहणार आहे. निश्चितच व्यावसायिक इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. ओला ही इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे अनेक ग्राहक आहेत.