Hyundai Car : ह्युंदाई ही देशातील एक लोकप्रिय कार मेकर कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. कंपनीची एक कार तर Car Of The Year हा पुरस्कार पटकावणारी कार बनली आहे.
आम्ही ज्या कारबाबत बोलत आहोत ती आहे ह्युंदाई कंपनीची एक्सेटर कार. ही गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहक अक्षरशा ठार वेडे आहेत. परिस्थिती एवढी भयानक आहे की ही गाडी खरेदी करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपूर्वीच बुकिंग करावे लागत आहे.
काही ठिकाणी तर ही गाडी बुक केल्यानंतर सहा सात महिन्यांनी ग्राहकांना दिली जात आहे. या गाडीचे भन्नाट फीचर्स तरुण वर्गाला वेड लावत आहेत. तरुणांमध्ये या गाडीची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे. ही गाडी टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रॉन्क्सला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवली गेली आहे.
विशेष म्हणजे या गाडीने या दोन्ही गाड्यांना चांगली टक्करही दिली आहे. दरम्यान कंपनीची ही लोकप्रिय गाडी आता ग्राहकांना फक्त एका लाख रुपये आपल्या नावावर करता येणार आहे. हो बरोबर आहे काय तुम्ही फक्त एका लाखात ही गाडी ग्राहकांना मिळणार आहे.
एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर ही गाडी ग्राहकांना घरी नेता येणार आहे. दरम्यान आज आपण या गाडीच्या फायनान्स प्लॅनिंगबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी बाजारात 17 वॅरिएंट मध्ये उपलब्ध आहे.
या गाडीची एक्स शोरूम किंमत सहा लाखांपासून सुरू होते आणि सव्वा दहा लाखांपर्यंत जाते. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 19.4 kmpl आणि CNG व्हेरिएंटचे मायलेज 27.1 km/kg पर्यंत असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून केला जात आहे.
दरम्यान आज आपण Hyundai Exter च्या SX DT या वॅरियंटचे फायनान्स डिटेल जाणून घेणार आहोत.
Hyundai Exter च्या SX DT या वॅरियंटचे फायनान्स डिटेल
Hyundai Exeter SX DT या मॅन्युअल वेरिएंटचे फायनान्स डिटेल्स आता आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. खरे तर या वेरियंटची एक्स-शोरूम किंमत ही 8.34 लाख रुपये एवढी आहे. तथापि या गाडीची ऑन-रोड किंमत 9,48,851 रुपये आहे.
मात्र शहरानुसार या ऑन रोड प्राईस मध्ये बदल होत राहणार आहे. तथापि आपण 9,48,851 एवढी ऑन रोड प्राईस राहिल्यास आणि एक लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यावर फायनान्स प्लॅन काय राहतील हे पाहणार आहोत.
जर समजा तुम्ही Exeter च्या या व्हेरिएंटची कार खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये डाऊनपेमेंट केले आणि उर्वरित रक्कम फायनान्स केली तर तुम्हाला 8,48,851 रुपये लोन घ्यावे लागणार आहे. जर समजा लोनचा कालावधी 5 वर्ष केला आणि त्यावर 9% व्याजदर आकारला जात असेल,
तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 17,621 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागणार आहेत. म्हणजेच या कार साठी तुम्हाला दोन लाख आणि आठ हजार रुपयांपेक्षा एवढे व्याज द्यावे लागणार आहे.