मोठी संधी! Google Pixel 10 वर तब्बल 9,619 रुपयांची सूट; दमदार Tensor G5 आणि 48MP कॅमेरासह फ्लॅगशिप आता स्वस्तात

Published on -

Google Pixel 10 : गुगलचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 10 आता ॲमेझॉनवर आकर्षक सवलतीत उपलब्ध झाला आहे. लाँचवेळी 79,999 रुपयांना उपलब्ध असलेला हा प्रीमियम स्मार्टफोन आता 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये केवळ 70,380 रुपयांना मिळत आहे.

म्हणजेच ग्राहकांना थेट 9,619 रुपयांची बचत करण्याची संधी आहे. याशिवाय Axis Bank क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 7.5 टक्क्यांपर्यंत (कमाल 1,000 रुपये) इन्स्टंट डिस्काउंटची ऑफर देखील दिली जात आहे.

Google Pixel 10 हा फोन OnePlus 15 5G, OPPO Find X9 आणि Samsung Galaxy S25 Plus 5G सारख्या फ्लॅगशिप मॉडेल्सना थेट टक्कर देणारा आहे. विशेषतः कॅमेरा क्वालिटी आणि क्लीन अँड्रॉइड अनुभवाच्या बाबतीत गुगलने आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला असून 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 3000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. त्यामुळे आउटडोअर वापरातही स्क्रीन स्पष्ट दिसते. डिस्प्लेला Corning Gorilla Glass Victus 2 चे मजबूत संरक्षण देण्यात आले आहे.

परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये गुगलचा नवीन Tensor G5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो AI-आधारित फीचर्स अधिक सक्षम बनवतो. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 48MP मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10.8MP टेलीफोटो सेन्सर (5x ऑप्टिकल झूम) दिला आहे. सेल्फीसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरीबाबत बोलायचे झाले तर यात 4970mAh क्षमतेची बॅटरी असून 30W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. एकूणच, प्रीमियम फीचर्स, दमदार कॅमेरा आणि गुगलचा शुद्ध अँड्रॉइड अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Pixel 10 ही सध्या खरेदीची उत्तम संधी ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News