Renault 7 Seater Car : भारतात सेव्हन सीटर कारला नेहमीच मागणी असते. यामुळे, भारतीय बाजारात विविध देशी आणि विदेशी कंपन्यांनी अनेक सेव्हन सीटर कार लाँच केल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या एर्टिगा या लोकप्रिय कारचा देखील समावेश होतो.
ही देशातील एक हॉट सेलिंग सेव्हन सीटर कार आहे. मारुती सुझुकीची ही कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे ही कार देशात सर्वाधिक विक्री होणारी सेव्हन सीटर कार म्हणून ओळखली जाते. दरम्यान मारुती सुझुकीच्या या कारला रेनॉल्ट कंपनीच्या ट्रायबर या कारकडून कडवी झुंज दिली जात आहे. तथापि ट्रायबर ही कार विक्रीच्या बाबतीत अजूनही मारुती एर्टिगापेक्षा खूपच मागे आहे.

तथापि, ट्रायबर ही कार रेनॉल्ट कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. कंपनीने नुकतीच जानेवारी 2024 मध्ये विक्री झालेल्या गाड्यांची माहिती जाहीर केली असून यामध्ये रेनॉल्ट ही कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी कार बनली आहे.
गेल्या महिन्यात या कारचे 2220 युनिट विकले गेले आहेत. दुसरीकडे जानेवारी 2023 मध्ये हाच आकडा 1,796 युनिट एवढा होता. अशा परिस्थितीत, आता आपण रेनॉल्ट ट्रायबर या कारची किंमत आणि स्पेसिफिकेशन थोडक्यात समजून घेणार आहोत.
रेनॉल्ट ट्रायबर कारची स्पेसिफिकेशन आणि किंमत
Renault Triber या कंपनीच्या लोकप्रिय कारमध्ये 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आहे. खरेतर, ही गाडी देशातील सर्वात स्वस्त सेव्हन सीटर कार आहे. या गाडीमध्ये देण्यात आलेले इंजिन 71bhp ची कमाल पॉवर आणि 96Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा करण्यात आला आहे. या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT सह जोडलेले आहे.
ट्रायबर 18 ते 19 kmpl मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी सुरक्षेच्या बाबतीत देखील खूपच उत्कृष्ट आहे. ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्टमध्ये कारला 4-स्टार सेफ्टी रेटिंग दिली आहे. गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर Renault Triber ची एक्स-शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलमध्ये 8.97 लाख रुपयांपर्यंत जाते.