Tata Upcoming Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता भारतात फक्त पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनेच धावत नसून इलेक्ट्रिक वाहनांनी देखील आपला जम बसवला आहे. खरेतर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
या प्रयत्नांमुळे आता देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहन हे पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांपेक्षा किफायतशीर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहता आता पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे वाहने परवडत नाहीत. हेच कारण आहे की आता इलेक्ट्रिक वाहनांना विशेष पसंती दाखवली जात आहे.
मात्र हे खरे असले तरी सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती खूपच अधिक आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे प्रत्येकालाच अफोर्डेबल ठरेलच असे नाही. प्रत्येकालाच इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करता येणे जमत नसल्याने इच्छा असूनही अनेकांना याची खरेदी करता येत नाही.
यामुळे अजून देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या फारशी वाढलेली पाहायला मिळत नाही. अशातच आता टाटा कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे टाटा कंपनी लवकरच एक इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार असून याची किंमत देखील सर्वसामान्यांना परवडेल अशी राहणार आहे.
खरे तर टाटा कंपनीने याआधी देखील इलेक्ट्रिक SUV बाजारात लॉन्च केल्या आहेत. टाटा टियागो आणि टाटा नेक्सॉन या इलेक्ट्रिक SUV ला कंपनीने याआधीच लॉन्च केले आहे. पण आता कंपनी स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही लाँच करणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना देखील इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करता येणार आहे.
कोणती इलेक्ट्रिक SUV लाँच करणार टाटा
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा लवकरच टाटा पंच ईवी लाँच करणार आहे. ही गाडी या चालू महिन्यातच लॉन्च होण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबर 2023 ला इलेक्ट्रिक SUV टाटा लॉन्च होणार आहे. यामुळे ज्या लोकांना नवीन वर्षात इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही गाडी फायदेशीर ठरू शकते. आता आपण या गाडीच्या विशिष्ट थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स ?
हाती आलेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये काही भन्नाट पिक्चर्स देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अद्याप कंपनीकडून या कारबाबत कोणतीही डिटेल माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, या नव्याने बाजारात दाखल होऊ पाहणाऱ्या कारची रेंज 350 किलोमीटरपर्यंत राहणार आहे.
कारचे दोन प्रकार असतील ज्यात वेगवेगळे बॅटरी पॅक असतील. कारमध्ये टू-स्पोक स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे. यासोबतच तुम्हाला 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिस्प्ले इंटिग्रेटेड सर्कुलर गियर सिलेक्टर डायल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, आर्मरेस्ट, एलईडी हेडलॅम्प आणि रियर डिस्क ब्रेक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या गाडीच्या लुक बाबत तसेच डिझाईन बाबत बोलायचे झाले तर लुक मध्ये कोणताच चेंज या ठिकाणी कंपनीकडून केला जाणार नाही. या गाडीचे चार्जिंग सॉकेट बंपर मध्ये दिले जाईल असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये सनरुफ देखील दिले जाणार आहे.
किंमत किती राहणार
या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही 10 ते 11 लाख आणि टॉप वॅरिएंटची किंमत ही 12 ते 13 लाख रुपये असू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. तथापि कंपनीने याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु वाढते कॉम्पिटिशन पाहता किंमत अशीच किफायतशीर राहणार हे मात्र नक्की.