Hero Destini Prime : जर तुम्ही सर्वात स्वस्त स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हिरोने आपली नवीन स्कुटर Hero Destini Prime लाँच केली आहे. जी तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
किमतीचा विचार केला तर या स्कुटरची एक्स-शोरूम किंमत रु. 71,499 इतकी आहे. Hero ची ही शानदार स्कुटर Honda Activa आणि TVS Jupiter, Yamaha Fascino Suzuki Access 125 आणि TVS Ntorq सह इतर लोकप्रिय स्कूटर्सशी टक्कर देते.
जाणून घ्या Hero Destini 125 Prime चे फीचर्स
Hero Destini 125 Prime च्या लुक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Xtec प्रकारातील LED लाईट्सच्या तुलनेत याला हॅलोजन हेडलॅम्प्स मिळत आहेत. तसेच हेडलाइटच्या आसपास कोणतेही दृश्यमान क्रोम उपलब्ध देखील नाहीत. यात Xtec प्रमाणे बॅक रेस्ट देखील नसेल.
यात ग्रॅब रेल देण्यात आली आहे. तसेच शेवटी, प्राइमचे स्वरूप आणि डिझाइन डेस्टिनीच्या वरच्या प्रकारांसारखेच असेल. तर दुसरीकडे, याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये अंडर सीट स्टोरेजमध्ये डिजिटल इन्सर्ट, यूएसबी चार्जिंग पोर्टसह अॅनालॉग स्पीडोमीटर दिलेला आहे. परंतु या डेस्टिनीच्या स्वस्त व्हेरियंटमध्ये काही तांत्रिक वैशिष्ट्यांचा अभाव असणार आहे.
मिळतील आकर्षक रंग पर्याय
Hero Destini 125 Prime मध्ये कंपनीने नेक्सस ब्लू, पर्ल सिल्व्हर व्हाइट आणि नोबल रेड या 3 आकर्षक रंगांच्या पर्याय दिले आहेत. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात 124.6cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन मिळेल, जे जास्तीत जास्त 9 पीएस पॉवर आणि 10.36 न्यूटन मीटरचा पिकअप टॉर्क जनरेट करेल. मायलेजबाबत हिरो मोटोकॉर्पचा असा दावा आहे की डेस्टिनीचे मायलेज 56 kmpl पर्यंत आहे. डेस्टिनी प्राइमला पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूस ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन मिळतील.
स्पर्धा
भारतीय बाजारातील इतर कंपन्यांच्या स्कूटर्सशी स्पर्धा करण्यासाठी Hero कडून Destini चे स्वस्त व्हेरियंट सादर करण्यात आले आहे. दरम्यान, कंपनी या स्कुटरवर अनेक दिवसांपासून काम करत होती. जर तुम्ही नवीन स्कुटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.