अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- भारतातील इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी आणि या वर्षीचा आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन, Hero Electric ने मंगळवारी भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीसाठी ’30 दिवस, 30 बाइक्स’ ही खास उत्सव ऑफर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्मात्या Hero Electric च्या या ऑफरमध्ये भाग्यवान ग्राहकांना भारतातील कंपनीच्या सर्व 700+ डीलरशिपवर मोफत Hero इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची संधी मिळेल.
या ऑफरचा एक भाग म्हणून, कंपनी दररोज एका भाग्यवान ग्राहकाची घोषणा करेल जो त्यांची आवडती इलेक्ट्रिक दुचाकी घरी घेऊन जाईल. चला तर मग या ऑफर बदलची सगळी माहिती घेऊया.
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर फ्री ऑफर :- कंपनीने पुढे जाहीर केले आहे की, Hero इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणारे सर्व ग्राहक आपोआप स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र असतील.
ही ऑफर 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड लकी ड्रॉद्वारे केली जाईल ज्यानंतर संपूर्ण एक्स-शोरूम किंमत परत केली जाईल. जर तुम्ही हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत असाल तर तुम्हाला ही स्कूटर नक्कीच मोफत मिळू शकते.
ऑनलाइन इलेक्ट्रिक स्कूटर बुक करा :- हिरो इलेक्ट्रिकच्या दुचाकींचे ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग करता येते. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर हीरो इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात.
किंवा तुम्ही भारतातील कंपनीच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊनही बुक करू शकता. याशिवाय, कंपनी स्वस्त EMI सह सुलभ वित्तपुरवठा पर्याय देखील देते आहे.
हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक स्कूटर :- Hero MotoCorp चे CFO निरंजन गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, मार्च 2022 पर्यंत Hero MotoCorp ची इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) सेगमेंटमधील पहिली स्कूटर लॉन्च केली जाईल.
याशिवाय, काही काळापूर्वी, Hero MotoCorp चे अध्यक्ष आणि CEO डॉ. पवन मुंजाल यांना कंपनीच्या पहिल्या प्री-प्रॉडक्शन इलेक्ट्रिक स्कूटर, प्रोटोटिनसोबत दिसले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम