हिरो मोटो कॉर्पने सादर केली वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक बाइक! 3 मिनिटांमध्ये रिक्षाची होते बाईक,वाचा या बाईकची महत्त्वाची वैशिष्ट्ये

Published on -

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहन हे फायदेशीर ठरतील. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स तसेच कार सध्या सादर केल्या जात असून त्यांना ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येत आहे.

जर आपण इलेक्ट्रिक बाइकचा विचार केला तर यामध्ये अनेक कंपन्या उतरले असून यामध्ये भारतातील हिरो मोटोकॉर्पचा देखील समावेश आहे. याच हिरो मोटोकोर्पने वैशिष्ट्यपूर्ण असे एक इलेक्ट्रिक वाहन सध्या सादर केले असून जे तीन चाकी देखील आहे आणि दुचाकी देखील आहे.

म्हणजेच अगदी सरळ सांगायचे म्हटले म्हणजे हे एक इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन असून या तीनचाकी वाहनाचे रूपांतर तुम्ही दुचाकी स्कूटरमध्ये देखील करू शकतात. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे व हिरो मोटो कॉर्पने या वाहनाला सर्ज असे नाव दिले आहे.

 हिरो मोटोकोर्पने सादर केले वैशिष्ट्यपूर्ण असे इलेक्ट्रिक वाहन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिरोने जयपूर येथे हिरो वर्ल्ड 2024 आयोजित केलेले होते व यामध्ये सर्ज S32(सर्ज) बहुउद्देशीय थ्री व्हीलर ची संकल्पना मॉडेल सादर केले असून हे तीनचाकी तसेच इलेक्ट्रिक स्कूटरचे देखील काम करेल. या स्कूटरला तुम्ही काही मिनिटात तीन चाकीत  कनेक्ट करू शकतात

आणि तिला वेगळी देखील करू शकता. विशेष म्हणजे हे मालवाहतुकीचे वाहन आहे व यामध्येच ही स्कूटर व्यवस्थित इन्स्टॉल केलेली आहे. म्हणजे तुम्ही अगदी सुरुवातीला या वाहनाला पहाल तर ती तीन चाकी आहे व समोरच्या सीटवर दोन लोक बसण्यासाठी जागा देखील आहे.

परंतु या तीन चाकी मधून जेव्हा स्कूटर बाहेर काढली जाते त्यानंतर तीन चाकी मधील जी काही बसण्याची क्षमता असते ती स्कूटरच्या सीटवर वळते. याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की जर थ्री व्हीलर मधून टू व्हीलर मध्ये हे वाहन रूपांतरित करायचे असेल तर त्यासाठी फक्त तीन मिनिटांचा कालावधी लागतो. हिरोच्या माध्यमातून S32 या सिरीजचे एकूण चार प्रकार लॉन्च करण्यात आलेले आहेत.

 प्रतितास साठ किलोमीटरचा मिळेल स्पीड

सर्ज S32 मध्ये तीन चाकी आणि दुचाकी साठी वेगवेगळे पॅरामीटर्स मिळतात. म्हणजेच यामधील S32 LD ही तीन चाकी असते तेव्हा तिला 10 Kw ची शक्ती मिळते व याकरिता तिला 11 Kwh च्या बॅटरीला जोडण्यात आलेले आहे व त्याचा कमाल वेग 45 किलोमीटर प्रतितास आहे. टू व्हीलर पॅरामीटरच्या बाबतीत त्याला 3 Kw ची शक्ती मिळते व याकरिता त्याला 3.5 Kwh च्या बॅटरीला कनेक्ट करण्यात आले आहे व याचा कमाल स्पीड हा प्रतितास 60 किलोमीटर इतका आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!