Hero Passion Plus : नवीन दुचाकी खरेदी करण्याचा प्लॅन असल्यास आजची बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. खरे तर सरकारने मागील महिन्यात जीएसटी कपातीचा मोठा निर्णय घेतलाय. आता 350cc पेक्षा कमी इंजिन असणाऱ्या दुचाकींवरील जीएसटी 18% झाला आहे. तसेच छोट्या कार्सवरील जीएसटी सुद्धा सरकारने दहा टक्क्यांनी कमी केलाय.
जीएसटी कपातीचा निर्णय झाल्यानंतर मोटरसायकलच्या किमती आवाक्यात आल्या आहेत. हिरो पॅशन प्लसची किंमत सुद्धा कमी झालीये. अशा स्थितीत आता आपण 5 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट केल्यानंतर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ? याची माहिती पाहुया.

हिरो पॅशन प्लसची किंमत 91 हजार 383 रुपये आहे. पण ज्या ग्राहकांचे बजेट कमी असेल त्यांना ही गाडी हप्त्यावर खरेदी करता येऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे हप्त्यावर ही गाडी खरेदी करायची असेल तर ग्राहकांना फक्त पाच हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल.
पाच हजार रुपये भरून ग्राहकांना ही गाडी आपल्या नावावर करता येऊ शकते. पाच हजार रुपयाचे डाऊन पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना 86 हजार 383 रुपयांचे बाईक लोन घ्यावे लागणार आहे. साधारणतः दुचाकीसाठी बँकांकडून दहा टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
आता जर या दरात ग्राहकांनी तीन वर्षांसाठी बाईक लोन घेतले तर 3 हजार 119 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. अर्थात हप्त्यावर ही गाडी ग्राहकांना एक लाख 17 हजार 284 रुपयांना पडणार आहे. परंतु हा सर्व हिशोब तुमच्या सिबिल स्कोर वर तसेच डाऊन पेमेंटच्या रकमेवर अवलंबून असेल.
तुम्ही डाऊन पेमेंट वाढवले तसेच परतफेडीचा कालावधी कमी केला तर तुम्हाला कमी व्याज द्यावे लागणार आहे. व्याजदर हा तुमच्या सिबिल स्कोरवर ठरत असतो. यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल आणि तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मंजूर झाले तर साहजिकच तुमचे पैसे वाचणार आहेत.