Hero Passion Xtec : गरिबांसाठी सुवर्णसंधी ! फक्त 8000 रुपये भरून घरी घेऊन जा Hero ची ‘ही’ नवीन बाईक, जाणून घ्या फीचर्स

Tejas B Shelar
Updated:

जेव्हा आपण शानदार बाईक, जास्त मायलेज याचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम Hero च नाव समोर येत. कारण चांगले मायलेज देणे हे या कंपनीचे सर्वात मोठे ध्येय आहे. याशिवाय आता त्यांच्या मोटरसायकल्समध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात.

त्यामुळे आता ज्यांच्याकडे बाईक घेण्यासाठीही जास्त पैसे नाहीत ते देखील Hero बाईक खरेदी करण्याचा विचहर करतात. तुम्हालाही बाईक घ्यायची असेल तर तुम्ही Hero Passion Xtec या बाईकचा विचार करू शकता.

Hero Passion Xtec ही उत्तम फीचर्स, लूक आणि इंजिन असलेली एक उत्तम बाईक आहे. ज्यांच्याकडे एकाच वेळी जास्त पैसे नाहीत ते हिरो पॅशन एक्सटेक बाईक अतिशय किफायतशीर किंमतीत खरेदी करू शकतात. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला या मोटारसायकलबद्दल सर्व माहीत येथे सांगणार आहोत.

Hero Passion Xtec Bike

हिरोच्या बहुतांश बाइक्सचे मायलेज उत्तम असते, त्यामुळे आज बजेट सेगमेंटमध्ये त्यांच्या मोटारसायकल्स बेस्ट ऑप्शन मानल्या जातात. कंपनीने याला पोलस्टार ब्लू, फोर्स सिल्व्हर आणि कँडी ब्लेझिंग रेड रंगात लाँच केले आहे. या बाईकच्या काही फीचर्सबद्दल जाणून घेऊ. तसेच हिरो पॅशन एक्सटेक बाईक तुम्ही फक्त 8000 रुपयांत खरेदी करून आपल्या घरी कशी आणू शकता हे देखील पाहू –

Hero Passion Xtec चे इंजिन

Hero Passion Xtec मध्ये सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे जे 113.2 सीसी इंजिनद्वारे चालते. जर त्या इंजिनच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर ते 9 बीएचपी पॉवर आणि 9.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या मोटारसायकलची पॉवर मॅनेज करण्यासाठी कंपनीने इंजिनमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे.

Hero Passion Xtec चे मायलेज व स्पीड

जवळजवळ सर्वच हिरो बाईक उत्तम मायलेज देतात, पण तरीही खरेदी करण्यापूर्वी लोकांना त्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. हिरो पॅशन एक्सटेक मोटारसायकलबद्दल बोलायचे झाले तर ती एक लिटर पेट्रोलमध्ये 68.21 किमीचे अंतर सहज पार करते. तर या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे.

8000 रुपयांत कसे खरेदी करावे ?

Hero Passion Xtec बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,687 रुपये आहे. तर, याची ऑन रोड किंमत 96,824 रुपयांवर पोहोचते. ही बाईक केवळ 8000 रुपये भरून खरेदी करता येईल, पण त्यासाठी फाइनेंस करावे लागणार आहे.

डाऊन पेमेंट म्हणून किमान आठ हजार रुपये भरल्यानंतर उर्वरित 88,824 रुपये फायनान्सअंतर्गत कर्ज म्हणून मिळणार आहेत. तीन वर्षांसाठी 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळाले तर तुम्हाला 36 महिन्यांसाठी 2858 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe