Honda Activa : मागील दोन दशकांपासून भारतीय वाहन बाजारात स्कूटर्सच्या सेगमेंटवर होंडा अॅक्टिव्हाचे वर्चस्व आहे. कारण भारतीयांची अॅक्टिव्हा ही सर्वात आवडती स्कूटर आहे. 75 हजार रुपयांच्या पुढे या स्कुटरची किंमत आहे. अनेकांचे बजेट कमी असते.
त्यामुळे त्यांना ही स्कुटर खरेदी करता येत नाही. परंतु आता तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही स्कुटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता ही स्कुटर सहज खरेदी करू शकता. तेही अवघ्या 10,000 रुपयात.
जाणून घ्या Honda Activa 6G डाउनपेमेंट EMI
कंपनीची काही दिवसांपूर्वी लाँच झालेली Honda Activa 6G चा सर्वात स्वस्त प्रकार, भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त विक्री करणारी स्कूटर, Activa STD ची एक्स-शोरूम किंमत 75,347 रुपये आणि ऑन-रोड किंमत 89,371 रुपये इतकी आहे.
परंतु तुम्ही 10,000 रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला 79,371 रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे. जर कर्जाचा कालावधी 3 वर्षांचा असल्यास व्याज दर 9% असेल, त्यामुळे तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी ईएमआय म्हणून 2,524 रुपये द्यावे लागणार आहे. Activa स्टँडर्ड व्हेरियंटला फायनान्स केला तर एकूण 12,000 रुपये व्याज आकारण्यात येणार आहे.
Honda Activa 6G DLX डाउनपेमेंट EMI
किमतीचा विचार केला तर Honda Activa 6G DLX प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 77,848 रुपये इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत 92,101 रुपये इतकी आहे. समजा तुम्ही 10,000 रुपये डाऊनपेमेंट करून फायनान्स केला तर तुम्हाला 82,101 रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे.
कर्जाचा कालावधी 3 वर्षांचा असून त्याचा व्याज दर 9% आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी मासिक हप्ता म्हणून 2,611 रुपये द्यावे लागणार आहे. या कर्जावर Activa DLX व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी सुमारे 12,000 रुपये व्याज लागणार आहे.
Honda Activa 6G H-Smart डाउनपेमेंट EMI
जर किमतीचा विचार केला तर Honda Activa 6G H-Smart व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 81,348 रुपये इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत 95,921 रुपये इतकी आहे. परंतु आता तुम्ही 10,000 रुपये डाऊनपेमेंट करून Activa H-Smart व्हेरिएंटला फायनान्स केला तर तुम्हाला 85,921 रुपये कर्ज मिळू शकते.
जर कर्जाचा कालावधी 3 वर्षांपर्यंत असून व्याज दर 9% असेल, त्यामुळे तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 2,732 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागणार आहे. Activa 6G H-Smart व्हेरियंटला फायनान्स करण्यासाठी 12,000 रुपयापेक्षा जास्त व्याज लागणार आहे.