Honda New Bike : जुलै महिन्यामध्ये ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या कार आणि बाईक लॉन्च झाल्या आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अनेक कार आणि बाईक्स लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना देखील ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे.
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda कडून त्यांची आणखी एक जबरदस्त बाईक भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये लॉन्च केली जाणार आहे. ३ ऑगस्ट रोजी त्यांची शक्तिशाली बाईक लॉन्च होणार आहे. होंडा कंपनीकडून त्यांच्या आगामी बाईकचा टिझर देखील रिलीज केला आहे.

होंडा कंपनीची 150-180 सीसी सेगमेंटची बाईक सादर केली जाणार आहे. त्यामुळे होंडा बाईक प्रेमींना नवीन बाईक खरेदीचा पर्याय मिळणार आहे. होंडा कंपनीची युनिकॉर्न बाईक सर्वाधिक लोकप्रिय बाईक ठरली आहे.
युनिकॉर्न बाईक ही होंडा कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. मात्र कंपनीची 160 सीसी इंजिन क्षमतेची कोणतीही बाईक नाही. कंपनीकडून त्यांच्या आगामी बाईकची कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
कंपनीने या बाईकबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नसली तरी कंपनीने सध्याचे ब्रँड नाव वापरल्यास ती शाईन, एक्स-ब्लेड किंवा एसपी असू शकते. त्यामुळे ग्राहकांना एक शानदार लुकसह आणखी एक बाईक मिळणार आहे.
होंडा कंपनीकडून त्यांच्या आगामी बाईकचे टीझरमध्ये फक्त टेल-लाइट आणि इंडिकेटर दाखवण्यात आले आहेत. तसेच या बाईला ‘बॅटविंग’ डिझाइन देण्यात आले आहे. तसेच बाईकला स्पोर्टी लूक आणि आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. बाइकमध्ये 162cc इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 12.7bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
होंडा कंपनीकडून नुकतीच त्यांची Activa Smart ही स्कूटर लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे. तसेच कंपनीने सांगितले की, आम्ही ग्रामीण बाजारपेठेवरही लक्ष केंद्रित करत आहोत.
होंडा कंपनीच्या आगामी बाईकची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच बाईकची वैशिष्ट्ये आणि किमतीबद्दल देखील काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यांच्या आगामी बाईकची एक्स शोरूम किंमत 1.10 लाख रुपये असू शकते. ३ ऑगस्ट रोजी कंपनीकडून त्यांची शक्तिशाली बाईक लॉन्च केली जाणार आहे.