₹2 लाख डाउन पेमेंटनंतर Wagon R ZXI+ AT साठी किती लागेल EMI?, वाचा फायनान्स प्लॅन

भारतीय कुटुंबांमध्ये मारुती वॅगन आर ही एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय हॅचबॅक कार मानली जाते. तुम्हाला जर ही कार खरेदी करायची असेल तर या लेखात जबरदस्त EMI प्लॅन दिला गेला आहे.वॅगन आर टॉप व्हेरिएंटच्या किमतीपासून EMI आणि व्याजसह एकूण खर्च किती येईल, हे जाणून घेऊयात-

Published on -

Wagon R ZXI+ AT |वॅगन आर ही एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय हॅचबॅक कार मानली जाते. विशेषतः तिच्या टॉप व्हेरिएंट ZXI+ AT मध्ये आधुनिक फीचर्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यामुळे ती अत्यंत सोयीची ठरते. जर तुम्ही वॅगन आरचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे ₹2 लाख डाउन पेमेंटसाठी आहेत, तर उर्वरित रक्कमेसाठी EMI किती असेल हे समजून घेणे आवश्यक आहे.

फायनान्स प्लॅन-

वॅगन आर ZXI+ AT ची एक्स-शोरूम किंमत ₹7.47 लाख आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये ही कार खरेदी करत असाल, तर RTO साठी ₹53,000, विम्यासाठी ₹31,000 आणि इतर चार्जेस (स्मार्ट कार्ड, MCD चार्ज, फास्ट टॅग) ₹5,685 देणे आवश्यक आहे. त्यामुळे या गाडीची ऑन रोड किंमत सुमारे ₹8.37 लाख होते.

₹2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवर म्हणजे ₹7.47 लाखवर कर्ज देते. यानुसार, उरलेली कर्जरक्कम सुमारे ₹5.47 लाख होते. जर बँक ही रक्कम 9% वार्षिक व्याजदराने 7 वर्षांसाठी देते, तर तुम्हाला दरमहा सुमारे ₹10,254 इतका EMI भरावा लागतो.

या कर्जावरील एकूण व्याज ₹2.24 लाख इतके येते. त्यामुळे गाडीची एक्स-शोरूम किंमत ₹7.47 लाख, अन्य खर्च ₹90,000 आणि व्याज ₹2.24 लाख असे धरल्यास, मारुती वॅगन आर ZXI+ AT या टॉप व्हेरिएंटची एकूण किंमत ₹10.61 लाख इतकी होते.

‘या’ गाड्यांशी थेट स्पर्धा

ही कार हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती Alto K10, S-Presso, Celerio तसेच Renault Kwid आणि Tata Tiago यांसारख्या बजेट गाड्यांशी थेट स्पर्धा करते. शिवाय, काही एंट्री लेव्हल SUV गाड्यांचे आव्हानही तिला सहन करावे लागते.

किफायतशीर EMI, भरोसेमंद ब्रँड आणि जबरदस्त फिचर्समुळे वॅगन आरचा टॉप व्हेरिएंट ही तुमच्या पुढच्या कारसाठी एक परफेक्ट निवड ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News