Hyundai Alcazar : ह्युंदाई कार भारतीय बाजारपेठेत विक्रीच्या बाबतीत चांगली कामगिरी करत आहेत. नाविन्यपूर्ण डिझाईन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे, ह्युंदाई आपल्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर आव्हान देत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आत्तापर्यंत देशांतर्गत बाजारात Hyundai Alcazar चे 75506 युनिट्स विकले गेले आहेत.
त्यात निर्यातीचे आकडे जोडले तर ही संख्या एक लाखाहून अधिक आहे. कंपनीने आतापर्यंत 27,176 युनिट्स परदेशात पाठवल्या आहेत. Hyundai Alcazar SUV 18 जून 2021 रोजी लाँच झाली. तेव्हापासून ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.
अहवालानुसार, Hyundai चे चेन्नई प्लांटमध्ये 36 महिन्यांत सुमारे 1.03 लाख Alcazar SUV चे उत्पादन करण्यात आले आहे. देशांतर्गत बाजारात विक्रीबरोबरच येथून ही कार परदेशातही पाठवण्यात आली आहे.
Hyundai कंपनीने FY2023 मध्ये Alcazar SUV च्या एकूण 38394 युनिट्सचे उत्पादन केले. त्यापैकी 26696 युनिट्सची भारतात विक्री झाली. यानंतर, आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने केवळ 31873 युनिट्सचे उत्पादन केले. यातील 20753 मोटारींची देशांतर्गत बाजारात विक्री झाली असून 10825 मोटारींची निर्यात झाली आहे.
मात्र, चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या अल्काझार विक्रीत किंचित घट झाली आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये या कारची एकूण विक्री केवळ 2163 युनिट्स होती. तर एप्रिल-मे 2023 मध्ये 4480 युनिट्सची विक्री झाली.
दरम्यान, आपल्या अल्काझारच्या विक्रीला चालना देण्यासाठी, कंपनी या एसयूव्हीच्या फेसलिफ्ट मॉडेलवर काम करत आहे, जी सणासुदीच्या हंगामात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. अलकाझरच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कंपनी ही कार लॉन्च करणार असल्याची माहिती आहे.
पॉवरट्रेन
या कारमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 160bhp ची कमाल पॉवर आणि 253Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय कारमध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.
Hyundai Alcazar SUV मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह येते. तुम्ही Hyundai Alcazar 8 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खरेदी करू शकता. या कारची जागा फॅमिली ड्राईव्हसाठी चांगली आहे.
किंमत
या SUV च्या किंमतीबद्दल सांगायचे तर, भारतीय बाजारात Hyundai Alcazar ची एक्स-शोरूम किंमत 16.77 लाख ते 21.28 लाख रुपये आहे. ही कार अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे.
यात 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, सनरूफ आणि हवेशीर फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग आहेत.