घाई करा ! या’ तारखेनंतर मारुती स्विफ्ट महागणार, सध्या मिळतेय 50 हजारांची सूट

मारुती स्विफ्ट येत्या 8 एप्रिलपासून तब्बल 62,000 रुपयांनी महागणार आहे, सध्या यावर 50,000 ची सूट मिळतेय, त्यामुळे ज्यांना स्विफ्ट खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे.ज्यांना स्विफ्ट खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे. कारण 8 एप्रिलनंतर किंमती वाढणार आहेत आणि सध्याच्या सवलतींचा लाभ घेण्याची ही शेवटची संधी असू शकते.

Updated on -

Maruti Swift Price Hike : भारतीय कार बाजारात एक मोठी बातमी समोर आली आहे. मारुती सुझुकी 8 एप्रिल 2025 पासून त्यांच्या अनेक कार्सच्या किमती वाढवणार आहे. विशेषतः लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट खरेदीस इच्छुक ग्राहकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही कार लवकरच 62,000 ने महाग होणार आहे.

स्विफ्टवर 50,000 ची सूट

किंमती वाढण्यापूर्वी कंपनी एप्रिल महिन्यात आकर्षक सूट देत आहे. यामध्ये स्विफ्टच्या AMT व्हेरियंटवर एकूण 50,000 पर्यंतचा फायदा मिळू शकतो. ही सूट 25,000 पर्यंत रोख सूट आणि 25,000 पर्यंत स्क्रॅपपेज बोनस या स्वरूपात आहे. तसेच मॅन्युअल व CNG व्हेरियंट्सवर 20,000 पर्यंत रोख सूट देण्यात येत आहे. सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.50 लाख दरम्यान आहे.

प्रवास अधिक आरामदायक

नवीन स्विफ्टमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आणि इनोव्हेटिव्ह अपडेट्स करण्यात आले आहेत. तिच्या इंटीरियरमध्ये वायरलेस चार्जर, ड्युअल चार्जिंग पोर्ट, 9 इंचाची टचस्क्रीन, नवीन डिझाइन केलेला डॅशबोर्ड, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट यांचा समावेश आहे. मागील एसी व्हेंट्स आणि रियर व्ह्यू कॅमेरा यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो.

फीचर्स आणि व्हेरियंट्स

सुरक्षा बाबतीत ही कार आता अधिक विश्वासार्ह बनली आहे. सर्व व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल, ESP, क्रूझ कंट्रोल, 3-पॉइंट सीट बेल्ट्स, ABS, EBD आणि ब्रेक असिस्ट यासारखी वैशिष्ट्ये मिळतात. नवीन LED फॉग लॅम्प्सदेखील यात जोडले गेले आहेत.

काय आहे स्विफ्टचे मायलेज

इंजिन विभागात नवीन Z सीरीज इंजिन दिले असून, 1.2 लीटर Z12E 3-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन 80 bhp पॉवर आणि 112 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसह माइल्ड हायब्रिड सेटअपही आहे.  ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल व 5-स्पीड AMT पर्याय आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की मॅन्युअल व्हेरियंट 24.80 km/l तर ऑटोमॅटिक व्हेरियंट 25.75 km/l मायलेज देतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe