काय सांगता ! ‘या’ कारच्या खरेदीवर मिळतोय तब्बल दोन लाख रुपयांचा डिस्काउंट, कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर ? पहा….

Tejas B Shelar
Published:
Hyundai Car Discount

Hyundai Car Discount : तुम्ही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याचा तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ह्युंदाई कंपनीने आपल्या एका लोकप्रिय एसयूव्ही कार वर लाखो रुपयांची डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. Hyundai कंपनीने भारतीय कार बाजारात अनेक एसयुव्ही कार लॉन्च केल्या आहेत.

कंपनीचा एसयुव्ही सेगमेंटचा पोर्टफोलिओ चांगला आहे. दरम्यान ह्युंदाई कंपनीच्या माध्यमातून आपल्या SUV च्या लाईनअप मधील लोकप्रिय असणाऱ्या लग्जरी टक्सन SUV या कारवर दोन लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट उपलब्ध करून दिला जात आहे.

मात्र ही ऑफर लिमिटेड टाईम साठी सुरू राहणार आहे. जे ग्राहक जुलै महिन्यात ही गाडी खरेदी करतील त्यांनाच या ऑफरचा फायदा होणार आहे. ही ऑफर 31 जुलै पर्यंत सुरू राहणार अशी माहिती समोर येत आहे.

यामुळे जर तुम्हाला ह्युंदाई कंपनीची ही लोकप्रिय एसयूव्ही स्वस्तात खरेदी करायची असेल तर तुम्हाला या चालू महिन्यातच ही गाडी घ्यावी लागणार आहे. कंपनीच्या माध्यमातून या गाडीवर दोन लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

मात्र 2023 आणि 2024 च्या मॉडेल नुसार डिस्काउंट कमी-जास्त राहणार आहे. यामुळे आता आपण नेमकी ही ऑफर कशी आहे, कोणत्या मॉडेलच्या खरेदीवर सर्वात जास्त डिस्काउंट मिळतोय याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कशी आहे ऑफर ?

मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai कंपनी टक्सन मॉडेल वर्ष 2023 च्या पेट्रोल मॉडेलवर 50,000 रुपये आणि डिझेल मॉडेलवर 2,00,000 रुपये रोख सूट ऑफर करत आहे.

तसेच 2024 च्या पेट्रोल मॉडेलवर 25,000 रुपये आणि डिझेल मॉडेल्सवर 50,000 रुपये रोख डिस्काउंट ऑफर केला जात आहे. Hyundai एप्रिलमध्येही ग्राहकांना अशीच सूट देत होती. फरक एवढाच होता की MY24 च्या पेट्रोल मॉडेलवर 50,000 रुपयांची सूट मिळत होती.

पण आता 2024 पेट्रोल मॉडेलवर फक्त पंचवीस हजार रुपयांची सूट आहे Tucson ची एक्स-शोरूम किंमत ही 29,01,800 रुपये आहे. पण या ऑफरचा लाभ घेतला तर ग्राहकांना कमी किमतीत ही एसयूव्ही कार खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe