Hyundai Casper: सध्या SUV सेंगमेंटमध्ये ग्राहकांच्या मनावर टाटा पंच राज्य आहे. उत्तम फीचर्स, जास्त मायलेज आणि बेस्ट लूकमुळे आज बाजारात टाटा पंच खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कमी बजेटमध्ये येणाऱ्या टाटा पंचने आतापर्यंत अनेक विक्रम देखील मोडले आहे. मात्र टाटा पंचची धाकधकू वाढवण्यासाठी बाजारात Hyundai Motor लवकरच नवीन SUV लाँच करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही SUV कमी बजेटमध्ये लाँच होणार असून ग्राहकांना यामध्ये एकापेक्षा एक फीचर्स देखील मिळणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या SUV ला 6 ते 7 लाख रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये ऑफर करणार असून बाजारात ही स्वस्त SUV Hyundai Casper या नावाने विकली जाणार आहे. यामध्ये ग्राहकांना स्पोर्टी लुकसह लेटेस्ट फीचर्स मिळणार आहे. Casper टाटा पंच सारख्या छोट्या SUV तसेच Citroën C3 सारख्या हॅचबॅकशी स्पर्धा करेल.
Hyundai Casper लुक आणि डिझाईन
Hyundai Casper च्या लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते 3.59 मीटर लांब, 1.59 मीटर रुंद आणि 1.57 मीटर उंच असेल. K1 कॉम्पॅक्ट कार प्लॅटफॉर्मवर आधारित कॅस्पर सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ह्युंदाई व्हेन्यूपासून प्रेरित असेल, म्हणून याला बेबी व्हेन्यू असेही म्हटले जाते. कॅस्परच्या पुढील बाजूस सिंगल स्लॅट ग्रिल, गोल आकाराचे हेडलॅम्प, LED DRLs आणि खालच्या बंपरमध्ये LED रिंग दिसतील. कॅस्परला अग्रेसिव बंपर, सिल्व्हर फिनिश स्किड प्लेट आणि वाइड एअर डॅम मिळेल.
Hyundai Casper फीचर्स
Hyundai Casper मध्ये ड्युअल टोन रूफ टेल, मल्टी स्पोक अलॉय व्हील्स आणि स्क्वेरिश व्हील आर्चसह ब्लॅक प्लॅस्टिक क्लेडिंग मिळेल. दुसरीकडे, फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कॅस्परमध्ये ड्युअल टोन इंटिरियर्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, कीलेस एंट्री, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि यासह अनेक स्टॅन्डर आणि सुरक्षा फिचर्स पाहायला मिळतील.
Hyundai Casper इंजिन आणि ट्रान्समिशन
Hyundai Casper चे इंजिन, पॉवर आणि ट्रान्समिशन बद्दल बोलायचे झाले तर ते 1.1 लीटर आणि 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मध्ये पाहिले जाऊ शकते, जे 82 bhp पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. कॅस्पर 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकते. Hyundai Casper यावर्षी सणासुदीच्या हंगामात लॉन्च होऊ शकते.
हे पण वाचा :- Jio Recharge : जिओ देणार अनेकांना दिलासा ! फक्त एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण वर्षासाठी फ्री डेटा ; वाचा सविस्तर