Creta इलेक्ट्रिक लॉन्च! एकदा चार्ज करुन तब्बल 473 किमी प्रवास करा

भारतीय ऑटोमोबाईल उद्योग वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असून ह्युंदाईने आपल्या क्रेटा इलेक्ट्रिक या नव्या मॉडेलसह बाजारात आर एन्ट्री मारली आहे. ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये सादर झालेल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

Published on -

Hyundai Creta Electric:- भारतीय ऑटोमोबाईल उद्योग वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असून ह्युंदाईने आपल्या क्रेटा इलेक्ट्रिक या नव्या मॉडेलसह बाजारात आर एन्ट्री मारली आहे. ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये सादर झालेल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

सर्वात खास बाब म्हणजे केवळ २५,००० रुपयेमध्ये या कारसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जे ग्राहक वेळीच बुकिंग करतील त्यांना गाडीची डिलिव्हरी जलद मिळेल.

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकची किंमत आणि बॅटरी क्षमता

क्रेटा इलेक्ट्रिकची सुरुवातीची किंमत ₹१७.९९ लाख (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. ही कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे –

४२ kWh बॅटरी पॅक – ३९० किमी रेंज देईल आणि ५१.४ kWh बॅटरी पॅक – ४७३ किमी रेंज देण्यास सक्षम आहे.या दोन्ही मॉडेल्समध्ये दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेजची हमी दिली आहे. शिवाय बॅटरीवर ८ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे, त्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी ही एक उत्तम निवड ठरू शकते.

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकची अत्याधुनिक वैशिष्ट्ये

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ पर्यावरणपूरक नाही, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही प्रगत आहे. यात ADAS लेव्हल २, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल टोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी स्मार्ट फीचर्स समाविष्ट आहेत.

कारच्या अंतर्गत डिझाइनमध्येही अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जसे की,ड्युअल पॉवर्ड व्हेंटिलेटेड सीट्स,पॅनोरॅमिक सनरूफ,नवीन स्टिअरिंग व्हील आणि डिजिटल सेंटर कन्सोल,स्वयंचलित ड्रायव्हिंग सहाय्यक प्रणाली इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत.

कधी आणि कुठे बुकिंग करायचे?

जर तुम्हाला ही दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करायची असेल तर त्वरित बुकिंग करणे गरजेचे असून ही बुकिंग ह्युंदाईने अधिकृत संकेतस्थळावर तसेच डीलरशिपवर बुकिंग सुरू केली आहे. फक्त ₹२५,००० मध्ये बुकिंग करून तुम्ही या अत्याधुनिक इलेक्ट्रिक कारचे मालक होऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe