Hyundai Creta : केवळ 2 लाख रुपये डाउनपेमेंट भरुन घरी न्या Hyundai Creta, किती द्यावा लागेल EMI? जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
Hyundai Creta

Hyundai Creta : ह्युंदाईच्या सर्वच कार्सना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी आपल्या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज देत असते. दरम्यान कंपनीची Creta ही कार बाजारात खूप लोकप्रिय आहे. अनेकांना या कारचा लूक आणि मायलेज खूप आवडत आहे.

तुम्ही या कारचे बेस मॉडेल 2 लाख डाऊन पेमेंटनंतर खरेदी करू शकता. या कारची किंमत रु. 10.87 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते आणि टॉप-एंड प्रकारासाठी रु. 19.20 लाखांपर्यंत जाते. जर तुमचे बजेट कमी असेल तर आता तुम्हीही 2 लाख डाऊनपेमेंटवर ही शानदार SUV खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

जाणून घ्या Hyundai Creta ची किंमत

जर किमतीचा विचार केला तर Hyundai Creta 1.5 पेट्रोल मॅन्युअल E च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10,87,000 रुपये इतकी आहे. यावर सुमारे एक लाख 20 हजार रुपयांचा आरटीओ आणि सुमारे 60 हजार रुपयांचा विमा आकारण्यात येणार आहे. उरलेली काही हजार रुपये अॅक्सेसरीजवरही खर्च होतील. Hyundai Creta E मॅन्युअल पेट्रोलची एकूण ऑन-रोड किंमत 12.72 लाख रुपये इतकी असणार आहे. परंतु हे लक्षात घ्या की ऑन-रोड किमतीत काही फरक असेल.

किती असेल कर्जाची रक्कम?

आता तुम्ही Hyundai Creta E मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटला रु. 2 लाख डाउनपेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला एकूण 10.72 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल.

किती असेल 5 वर्षांचा EMI?

जर तुम्ही क्रेटा फायनान्स पर्यायामध्ये 5 वर्षांपर्यंत कर्ज घेत असल्यास व्याज दर 9% असणार आहे. तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी 22 हजार रुपयांपेक्षा जास्त ईएमआय मिळेल.

किती येईल व्याज ?

Hyundai Creta E मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटला फायनान्स करण्यासाठी 2.6 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज लागणार आहे. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही देखील Hyundai Creta ला फायनान्स करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात अगोदर Hyundai Motor India डीलरशिपला भेट देऊन फायनान्स डिटेल्स तपासा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe