Hyundai Launch New Car : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात सनरुफ असणारी कार खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर, भारतात सनरूफ असणाऱ्या कारची किंमत ही सामान्य कारच्या तुलनेत अधिक असते. मात्र, सनरूफ असणाऱ्या कारने प्रवास करणे खरचं मजेशीर असते.
यामुळे अनेकजण सनरूफ असणारी कार खरेदी करण्याला प्राधान्य दाखवतात. यासाठी ग्राहक अतिरिक्त पैसे खर्च करतात. पण, आता ग्राहकांना स्वस्तात सनरूफ असणारी कार खरेदी करता येणार आहे.
कारण की Hyundai कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आपल्या एका लोकप्रिय कारचे एक नवीन व्हेरियंट बाजारात लॉन्च केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई कंपनीने कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूचा एक नवीन व्हेरियंट S(O)+ लॉन्च केले आहे.
याचं व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे अलीकडेच लॉन्च झालेल्या या वेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9,99,900 रुपये आहे. म्हणजे ही गाडी दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.
यामुळे हे अलीकडेच लॉन्च झालेले मॉडेल इलेक्ट्रिक सनरूफसह देशातील सर्वात स्वस्त मॉडेल देखील बनले आहे. कंपनीने या मॉडेलच्या आधुनिक डिझाइनला प्रगत तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीची जोड देण्यात आली आहे.
कशी आहे ह्युंदाई वेन्यू ?
ह्युंदाई वेन्यू ही कंपनीची एक लोकप्रिय SUV कार आहे. या कारच्या या प्रकारात 1.2 लीटर कप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे की, मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
यात स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी डीआरएलएस, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेच्या समर्थनासह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. या कारमध्ये असे अनेक फीचर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
कंपनीने या प्रकारात सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतलेली आहे हे विशेष. कमी बजेटमध्ये ही एक जबरदस्त फीचर्स असणारी कार आहे. कंपनीने या कारचे नुकतेच जे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे यामुळे या गाडीची लोकप्रियता आणखी वाढणार असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जात आहे.
या गाडीमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, TPMS हायलाइन, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC) आणि मागील कॅमेरा यांसारखें फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने या वॅरियंटची किंमत दहा लाखांच्या आतच ठेवली असल्याने याची भारतीय कार मार्केटमध्ये मागणी वाढणार असे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.