7-Seater Electric SUV | भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि वाहन उत्पादक कंपन्याही या सेगमेंटमध्ये नवनवीन मॉडेल्स सादर करत आहेत. या स्पर्धेत आघाडी घेत Hyundai देखील 7-सीटर इलेक्ट्रिक SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. नुकतीच या गाडीची टेस्टिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या टेस्टिंगमध्ये कोणते महत्त्वाचे अपडेट्स मिळाले आहेत, ते जाणून घेऊया.
Hyundai आणणार 7-सीटर इलेक्ट्रिक SUV
Hyundai Motors आपल्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओचा विस्तार करत असून लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक SUV लाँच करू शकते. सध्या कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार या नवीन मॉडेलची चाचणी घेतली जात आहे.

टेस्टिंगमध्ये समोर आलेले अपडेट्स
टेस्टिंग दरम्यान Hyundai च्या या नवीन SUV ला कॅमोफ्लाज्ड स्वरूपात पाहिले गेले. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे चार्जिंग पोर्ट समोरील भागात देण्यात आला आहे. तसेच, ही SUV 3-रो सीटिंग लेआउटसोबत येऊ शकते, म्हणजेच ही एक फुल-फ्लेजड 7-सीटर इलेक्ट्रिक SUV असेल.
Alcazar चे इलेक्ट्रिक वर्जन येणार?
Hyundai सध्या Alcazar SUV चे ICE (इंटरनल कंबशन इंजिन) मॉडेल विकत आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी या लोकप्रिय SUV चेच इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणू शकते. जर तसे झाले, तर Alcazar EV Hyundai च्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये एक नवे आकर्षण ठरेल.
बॅटरी आणि रेंज
Hyundai आपल्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये दोन बॅटरी पर्याय देऊ शकते. यामध्ये 42 kWh आणि 51.4 kWh बॅटरी पॅकचा समावेश असेल. अंदाजानुसार, या SUV ची सिंगल चार्जवर रेंज जवळपास 500 किलोमीटर असू शकते, जे भारतीय ग्राहकांसाठी मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो.
Hyundai चा EV पोर्टफोलिओ
भारतीय बाजारात Hyundai ने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली चांगली पकड बनवली आहे. कंपनीने प्रीमियम सेगमेंटमध्ये Hyundai Ioniq5 लाँच केली असून, नुकतेच मिड-साइज इलेक्ट्रिक SUV म्हणून Hyundai Creta EV सादर केली आहे. या दोन गाड्यांच्या दरम्यानची जागा Alcazar EV भरू शकते.
कधी होणार लाँच?
कंपनीकडून याबबात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार ही नवीन इलेक्ट्रिक 7-सीटर SUV 2025 च्या शेवटपर्यंत किंवा 2026 च्या सुरुवातीला भारतीय बाजारात दाखल होऊ शकते.