Best Cars Under 5 Lakh : मोठ्या शहरांमध्ये बहुतेक लोक ऑफिसला जाण्यासाठी कार वापरतात. इतर वाहनांपेक्षा कार सुरक्षित आहे आणि दुचाकीप्रमाणे प्रवासादरम्यान धूळ, घाण इत्यादींचा सामना करावा लागत नाही. मात्र, शहरांमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे गाडी चालवणे थोडे अवघड जाते. याशिवाय पार्किंगचीही समस्या आहे.
अशास्थितीत बहुतांश कर्मचारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी छोट्या कारला प्राधान्य देतात. अशातच जर तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मारुती सुझुकी सेलेरियो, रेनॉल्ट क्विड आणि एमजी कॉमेट ईव्हीचा विचार करू शकता. चला या कारच्या किमती आणि फीचर्स बद्दल जाणून घेऊया..
Maruti Suzuki Celerio
मारुती सुझुकी सेलेरियो कारची किंमत 4.99 लाख ते 7.04 लाख रुपये दरम्यान आहे. यात 1-लिटर पेट्रोल आणि CNG इंजिनचा पर्याय आहे. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
हे 25.24 ते 34.43 kmpl पर्यंत मायलेज देते. Celerio मध्ये 5 लोक आरामात प्रवास करू शकतात. यात 7-इंच टचस्क्रीन, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षिततेसाठी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS आणि EBD वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
Renault KWID
या कारची सुरुवातीची किंमत 4.70 लाख रुपये आहे. यात 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे 21.46 ते 22.3 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. यामध्ये ५ जण प्रवास करू शकतात.
MG Comet EV
शहरांमधील गर्दी लक्षात घेता, ही छोटी ईव्ही सर्वोत्तम आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 6.99 लाख ते 9.53 लाख रुपये दरम्यान आहे. या कारमध्ये 4 लोक आरामात बसू शकतात.
यात 17.3 KWh चा बॅटरी पॅक आहे, ती पूर्ण चार्ज केल्यावर 230 किमी पर्यंत धावू शकते. Comet EV चा बॅटरी पॅक 3.3 kW चा चार्जर वापरून फक्त 7 तासात 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.
फीचर्सच्या बाबतीतही ही कार अतिशय उत्तम आहे. यात ड्युअल 10.25-इंच स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.