Best Petrol Cars : पेट्रोल कार घेण्याचा विचार असेल तर ‘हे’ 6 पर्याय आहेत सर्वोत्तम, मायलेजही जबरदस्त

Content Team
Updated:
Best Petrol Cars

Best Petrol Cars : तुम्हीही नजीकच्या भविष्यात परवडणाऱ्या किमतीत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या कारची नेहमीच मागणी असते. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये, मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि टाटा मोटर्स या भारतातील सर्वाधिक विक्री करणाऱ्या कंपन्यांचे मॉडेल्स खूप लोकप्रिय आहेत. आत्तापर्यंत देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार, मारुती सुझुकी अल्टो K10 देखील या यादीत सामील आहे. चला जाणून घेऊया अशाच 5 पेट्रोलवर चालणाऱ्या कार ज्यांची किंमत 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकी अल्टो K10 ही भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये 24.39 किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. Maruti Suzuki Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कंपनी तसेच देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. Maruti Suzuki S-Presso मध्ये 24.12 किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. मारुती सुझुकी S-Presso ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट क्विड

Renault Kwid ही भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार आहे. Renault Kwid मध्ये 21.7 किमी प्रति लीटर मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. Renault Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी सेलेरियो ही कंपनीच्या लोकप्रिय कारपैकी एक आहे. Maruti Suzuki Celerio मध्ये प्रति लिटर 25.24 किमी पर्यंत मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. मारुती सुझुकी सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत 5.36 लाख रुपये आहे.

टाटा टियागो

टाटा मोटर्सची कंपनीची टाटा टियागो ही गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ही कंपनीची एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. या कारची किंमत सहा लाखाच्या आतच आहे. ही गाडी तब्बल 24.35 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर

मारुती सुझुकी वॅगनआर ही गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये 24.35 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. मारुती सुझुकी वॅगनआरची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe