Car News : 2023 हे वर्ष येत्या तीन दिवसात संपणार आहे. हे चालू वर्ष भारतीय कार बाजारासाठी खूपच उत्कृष्ट राहिले आहे. या चालू वर्षात विविध कार निर्मात्या कंपन्यांनी वेगवेगळे मॉडेल्स लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे 2023 मध्ये लाखो लोकांनी कार खरेदीचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
खरे तर, भारतात नेहमीच स्वस्तातल्या कारला पसंती दाखवली जाते. मध्यमवर्गीय कुटुंब स्वस्तात चांगले फीचर्स असणाऱ्या कार खरेदीला पसंती दाखवतात. यामुळे भारतीय कंपन्या देखील मध्यमवर्गीयांची हीच गरज आणि आवड लक्षात घेऊन अशाच गाड्यांची अधिक निर्मिती करत असतात.
दरम्यान येत्या चार दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार असून नवीन वर्षात स्वस्तात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे देशातील 3 लोकप्रिय आणि स्वस्त कार आता 2024 मध्ये रस्त्यावर दिसणार नाहीत.
कारण की संबंधित कार मेकर कंपनीने या गाड्यांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आता आपण या लिस्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या गाड्यांचा समावेश आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मारुती अल्टो 800 : हाती आलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात ही गाडी आता रस्त्यावर दिसणार नाही. मारुतीच्या माध्यमातून या गाडीची दीर्घ काळापासून निर्मिती केली जात होती. ही कंपनीची एक हॉट सेलिंग कार म्हणून ओळखली जात होती.
छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये या गाडीची मोठी क्रेझ होती. ही गाडी सर्वसामान्यांसाठी खूपच कीफायतशीर होती. या गाडीची एक्स शोरूम किंमत पाच लाख 13 हजारापर्यंत होती. ही गाडी मात्र 2024 मध्ये दिसणार नाही. या गाडीची नवीन वर्षात विक्री बंद होणार आहे. ही गाडी 2021 मध्ये लॉन्च झाली होती.
Honda Jazz : भारतातील एक प्रमुख वाहन निर्माता कंपनी म्हणून होंडा या कंपनीची ओळख आहे. कंपनीने अनेक लोकप्रिय वाहनांची निर्मिती केली आहे. होंडा कंपनीची Honda Jazz ही गाडी बरीच वर्ष तरुण वर्गाची पहिली पसंत राहिली. या कारचा मोठा दबदबा होता.
पण या मॉडेलची नवीन गाडी आता रस्त्यावर दिसणार नाही. कारण की, Honda Jazz ची विक्री आता बंद होणार अशी माहिती समोर आली आहे. ही गाडी पहिल्यांदा 2009 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लाँच झाल्यापासूनच ही गाडी मध्यमवर्गीयांमध्ये विशेष लोकप्रिय बनली होती.
होंडा सिटी फोर्थ जनरेशन : होंडा कंपनीची ही देखील एक लोकप्रिय गाडी होती. ही गाडी आपल्या दमदार परफॉर्मन्स आणि लुक मुळे ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय बनली होती. या कारची शेवटची नोंद केलेली किंमत 9.50 लाख ते 10 लाख रुपये एवढी होती. आता मात्र ही गाडी रस्त्यावर दिसणार नाही कारण की या गाडीची विक्री बंद होणार आहे. या गाडीची 2014 मध्ये लौचिंग झाली होती आणि तेव्हापासून ही गाडी कंपनीची एक हॉट सेलिंग कार बनलेली होती.