India Safest Cars : देशात सध्या अनेक कंपन्यांच्या कार ऑटो क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक कारची सुरक्षा रेटिंग ही वेगवेगळी आहे. कंपनीनुसार कारची सुरक्षा रेटिंग देखील बदलत असते. सध्या ऑटो मार्केटमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग असणाऱ्या कार देखील उपलब्ध आहेत.
नवीन कार खरेदी करता असताना अनेक ग्राहक कारचे मायलेज, किंमत पाहत असतात. मात्र अनेकदा ग्राहक त्या कारच्या सुरक्षेबद्दल जाणून घेत नाहीत. मात्र कार खरेदी करताना ग्राहकांनी प्रथम त्यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कार सुरक्षा कार्यक्रम ग्लोबल NCAP ने भारतात उत्पादित केलेल्या सर्वात सुरक्षित कारची यादी जाहीर केली आहे. NCAP कडून देशात तयार होणाऱ्या सर्व कारची सुरक्षा चाचणी घेतली जाते.
या सुरक्षा चाचणीमध्ये टाटा मोटर्सच्या 2 कार आणि महिंद्र अँड महिंद्राच्या एका कारला ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे या ३ कार देशातील सर्वात सुरक्षित कार मानल्या जातात.
महिंद्रा XUV300
महिंद्रा कंपनीची ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. सध्या कंपनीची सर्वात जास्त विक्री कार आहे. मजबूत वैशिष्ट्ये आणि किंमत कमी असल्याने ग्राहकांची देखील चांगली पसंती या कारला मिळत आहे.
महिंद्रा XUV300 ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडीनुसार कार खरेदी करू शकतात. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.95 लाख रुपये आहे.
टाटा अल्ट्रोझ
टाटा अल्ट्रोझ कारला देखील ग्लोबल NCAP सुरक्षा चाचणीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे ही कार देखील सुरक्षेच्या बाबतीत सर्वोत्तम कार ठरली आहे. टाटा अल्ट्रोझ कार डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.44 लाख रुपये आहे.
टाटा नेक्सॉन
टाटा नेक्सॉन कारला देखील ग्लोबल NCAP सुरक्षा चाचणीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार 1.2-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन पर्यायांसह येते. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल-होल्ड असिस्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख आहे.
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा
मारुती सुझुकी एका कारचा देखील सुरक्षा रेटिंगमध्ये ४ क्रमांक लागत आहे. विटारा ब्रेझा कारला देखील ग्लोबल NCAP सुरक्षा चाचणीमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. ब्रेझाची दिल्लीतील सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.34 लाख रुपये आहे.