India’s Best Selling Car:- भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपन्यांनी जानेवारी २०२५ साठी विक्री अहवाल जाहीर केला असून या अहवालानुसार मारुती सुझुकीने पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ब्रँडचा मान मिळवला आहे.
टाटा मोटर्स आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांना विक्रीत घसरण अनुभवावी लागली असली तरी मारुती सुझुकी आणि महिंद्राने चांगली वाढ नोंदवली आहे. मारुती सुझुकीने जानेवारी २०२५ मध्ये एकूण २,१२,२५१ युनिट्स विक्रीसाठी पाठवली. जी जानेवारी २०२४ मधील १,९९,३६४ युनिट्सच्या तुलनेत ०.६ टक्क्यांनी अधिक आहे.
![best selling cars](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/best.jpg)
देशांतर्गत प्रवासी कार विक्रीतही कंपनीने उल्लेखनीय कामगिरी केली असून गेल्या वर्षीच्या १,६६,८०२ युनिट्सच्या तुलनेत यावर्षी १,७३,५९९ युनिट्स विक्री झाली आहे. यामध्ये ४.०७ टक्के वाढ नोंदवली गेली.
मारुती सुझुकीची निर्यातीमधील कामगिरी
मारुती सुझुकीने केवळ देशांतर्गतच नव्हे तर निर्यातीमध्येही दमदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी २३,९२१ युनिट्स निर्यात करण्यात आले होते.तर यंदा जानेवारी महिन्यात निर्यात २७,१०० युनिट्सपर्यंत पोहोचली.
कंपनीच्या या वाढलेल्या विक्रीचा मुख्य फायदा त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या वाढत्या मागणीमुळे झाला आहे. विशेषतः मारुती सुझुकीच्या एसयूव्ही आणि हॅचबॅक सेगमेंटमधील गाड्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ह्युंदाईची मात्र विक्रीत घसरण
दुसरीकडे ह्युंदाई मोटर इंडियाला विक्रीत घट सहन करावी लागली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत ३ टक्क्यांची घट झाली असून जानेवारी २०२५ मध्ये ६५,६०३ युनिट्स विक्री झाली.जी गेल्या वर्षी याच कालावधीत ६७,६१५ युनिट्स होती.
विशेषतः देशांतर्गत बाजारपेठेत ह्युंदाईच्या विक्रीत घट झाली असून गेल्या वर्षी ५७,११५ युनिट्सच्या तुलनेत यावर्षी ५४,००३ युनिट्सची विक्री झाली आहे. मात्र निर्यातीमध्ये कंपनीने सुधारणा केली असून १०,५०० युनिट्सच्या तुलनेत यंदा ११,६०० युनिट्स निर्यात करण्यात आल्या.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की भारतीय ग्राहकांचा कल अजूनही मारुती सुझुकीच्या गाड्यांकडे आहे. किफायतशीर किंमत, इंधन कार्यक्षमतेत आघाडी आणि सर्व्हिस नेटवर्क यामुळे मारुती सुझुकीला इतर स्पर्धकांच्या तुलनेत मोठा फायदा मिळतो. मात्र टाटा मोटर्स आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांसाठी ही आकडेवारी चिंतेचा विषय ठरू शकते.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढती गुंतवणूक आणि नवीन मॉडेल्सच्या लॉन्चिंग मुळे येणाऱ्या काळात भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेता या कंपन्यांना आपली विक्री टिकवून ठेवण्यासाठी अधिक नाविन्यपूर्ण उपाययोजना कराव्या लागतील.